Home Breaking News हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कार्यकर्त्यांकडुन स्वागत!

हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कार्यकर्त्यांकडुन स्वागत!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक 15 जुन 2024

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तब्बल लाखांच्या वर लीड घेऊन प्रचंड विजय संपादन केला आहे. त्यांचे दिल्लीवरून मतदारसंघात नुकतेच आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत होते. नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे गावागावात आगमन होताच प्रत्येक गावातील कार्यकर्ते त्यांचा शाल आणि पुष्पहार घालून स्वागत करीत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
नुकतीच खासदार आष्टीकर साहेबांनी हिंगोली आणि नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच खते, बियाणे याविषयी आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. अश्या सुचनाही अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.
एकंदरीतच हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांकढुन खासदार आष्टीकर साहेबांचे जल्लोषात स्वागत होत आहे.

Previous articleजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक सवना शाळेतर्फे पहिल्याच दिवशी केले चिमुकल्यांचे स्वागत.
Next articleमहाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा समाजातील गुणवंत व यशवंतांचा विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न……