Home Breaking News रेल्वे प्रवाशांनो विनातिकीट प्रवास महागात पडणार…

रेल्वे प्रवाशांनो विनातिकीट प्रवास महागात पडणार…

👉नांदेड-आदिलाबाद विभागात तिकीट तपासणी मोहिमेत 185 जणांवर दंडात्मक कार्यवाही.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक:30.05.2025

रेल्वेस्थानकात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश आणि अनधिकृत रेल्वे प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने रेल्वे विभाग नियमित पणे तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते.

प्रदीप कामले, माननीय विभागीय रेल्वे व्यवस्थापक/नांदेड यांच्या सूचनेनुसार आणि डॉ. विजय कृष्णा/वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शना नुसार, दिनांक 29 मे, 2025 रोजी नांदेड-आदिलाबाद विभागात एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम श्री श्रीनिवास सूर्यवंशी / सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.

यादरम्यान नंदीग्राम एक्सप्रेस आणि पूर्णा-पटना एक्सप्रेस गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, अनधिकृत विक्रेते, तिकिटे नसलेले प्रवासी तसेच सीझन तिकीट किंवा जनरल तिकिटांसह आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. एकूण ₹ 108080.00 (एक लाख आठ हजार ऐंशी रुपये) दंड आकारण्यात आला.

विभागीय फिरते पथक (डीएफएस-1), नांदेड ज्यात 08 तिकीट तपासनीस होते आणि आदिलाबाद तसेच नांदेड वाणिज्य कार्यालयातील 03 वाणिज्य निरीक्षक यांनी या तिकीट तपासणी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे कि त्यांनी योग्य तिकीट घेवूनच रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश करावा आणि दंडात्मक कार्यवाही टाळावी. अशा प्रकारची तिकीट तपासणी मोहीम विभागातील इतर स्थानकांवर तसेच रेल्वे गाड्यांत करण्यात येईल .

ही दंडात्मक कारवाई रेल्वे प्रवाश्यांची सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्याची वचनबद्धता अधोरेखित करते.

Previous articleसततच्या मुसळधार पावसामुळे जनजिवण विस्कळीत..
Next articleपार्डी येथे राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी…