मारोती अक्कलवाड पा. सवनेकर*जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 16/08/2025
👉सरसकट आर्थिक मदतीची मागणी..
👉घरातही पाणी घुसले.
👉*रस्त्याला आले तळ्याचे स्वरुप..
नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसापासुन सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी सकाळी चार वाजता पासुन सर्वदुर पावसाने हाहाकार माजविला आहे. हिमायतनगर, किनवट, भोकर, हदगांव तालुक्यात शेतक-यांच्या शेतातील पिके हळद, ऊस, कापुस, सोयाबिन, मुग, उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेतक-यांच्या शेतातुन एखादी नदी वाहते की काय? असेच चित्र दिसत आहे. जमिनीवरील पिके मुळासकट खरडुन गेले आहेत. शेतक-यांने स्वताच्या धर्मपत्नीचे दागिणे गहाण ठेवुनी काळ्या आईची ओटी भरली आहे. त्यात अतिवृष्टीच्या पावसाने कहर केला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकारने सरसकट शेतक-यांना आर्थिक मदत देऊन संकटातुन बाहेर काढावे…
👉गावातील घरातही पाणी शिरले. सतत आठ ते नऊ तास मुसळधार पाऊस पडल्याने गोरगरीबांच्या घरात पाणी जाऊन संसार उघड्यावर पडला आहे..घरपडी देऊन सहकार्य करावे..अशी मांगणी होत आहे.
👉 रस्त्याला तळ्याचे स्वरुप.. पावसाचा रौद्र अवतार आणी विजेचा कडकटा पाहुन नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण होत होते..
एकंदरीत या पावसाने सर्वाचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी, नागरीकांचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. सत्ताधारी आमदार बाबुराव कदम साहेब आणी विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांनी सरकारकडुन शेतक-यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी शेतक-यांची मागणी जोर धरत आहे..



