
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे यांच्या सातत्याच्या प्रयत्नां ना मिळाले यश
कार्यालयीन प्रतिनिधी
नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने सन 2017 मध्ये राबविलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील 973 उमेदवांचे परीक्षा शुल्क परत करण्याची कार्यवाई महापालिकेच्या शिक्षण विभागाने चालू केली आहे.भरती प्रक्रिये मध्ये सामील 973 उमेदवांचे रक्कम रुपये 3 लाख 27 हजार 700 रुपये नाशिक महापालिकेचकडे मागील 8 वर्षा पासून थकीत होते.या थकीत शुल्का साठी हेमंत शिंदे अध्यक्ष ओबीसी महासंघ यांच्या नेतृत्वा खाली शिक्षक बेरोजगार उमेदवार गेल्या सात वर्षा पासून चकरा मारीत होते.
हेमंत शिंदे यांनी हे शुल्क परत मिळावे म्हणूनसातत्याने आंदोलन करून उमेदवारांचे काही प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह तात्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन 14 महिने झाले तरी भरती च्या बाबतीत काहीही कार्यवाही झालेली नाही या विषयी जाब विचारला असता आयुक्त यांनी ही मानधना वरील भरती मी रद्द केली आहे असे शिष्टमंडळाला सांगितले.
परंतु या भरती प्रक्रियेकरिता हजारो उमेदवारांनी खुल्या वर्गाकरिता 500 रुपये व राखीव प्रवर्गा करिता 300 रुपये शुल्क महापालिका आयुक्त यांच्या नावे डी. डी. द्वारे दिल्याचे उमेदवारांच्या समोर पुराव्या सहित आयुक्ताच्या निदर्शनास आणून दिले.
आयुक्त तुकाराम मुंडे यांनी उमेदवारांचे शुल्क परत करण्याचे अश्वासन दिले.परंतु काही दिवसांनी आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली झाल्याने ही कार्यवाही सुरूच झाली नाही.त्यानंतर करोनाच्या दोन वर्षा च्या काळात या विषयाच्या बाबतीत उदासीनताच दिसून आली.
त्यानंतर आयुक्त करंजकरअसताना पुन्हा एकदा शिष्टमंडळासह त्यांची भेट घेतली असता इतक्या वर्षा नंतरत्या शिक्षक उमेदवारांना त्यांचे शुल्क त्यांना परत मिळाले नसल्याचे त्यांना अवगत करून दिले व ताबडतोब सर्व उमेदवारांना त्यांची पुर्तता केलेली आर्थिक शुल्काची रक्कम नाही मिळाली तर ओबीसी महासंघाच्या वतीने महानगरपालिकेच्या विरुद्ध जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे यांनी आयक्तांना दिला होता.त्यांच्या या आक्रमक आंदोलनाची दाखल आयुक्ता ना तातडीने घ्यावी लागली व या बुडीत खात्यात जमा झालेल्या रकमेची परत आयुक्ताना आर्थिक तरतूद महानगरपालिकेच्या अर्थासंकल्पात करावी लागली.
परंतु या नंतर हि मनपा शिक्षण विभागाने अपुरे कर्मचारी वर्गा उपलब्ध असल्याचे कारण देऊन त्या उमेदवारांशी संपर्क करून त्यांचे बँक डिटेल्स जमा करण्याचे काम ओबीसी महासंघा चे अध्यक्ष हेमंत शिंदे यांनाच करावयास सांगितले. त्यानुसार उमेदवारांशी त्यानुसार उमेदवारांडशी संपर्क करून व काहींनी मनपा शिक्षण विभागात संपर्क करावा व बँक डिटेल्स जमा करावेत म्हणून ओबीसी महा संघा चे अध्यक्ष हेमंत शिंदे यांनी सर्व वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करावी म्हणून म्हणून मनपा प्रशासनास सुचवले. त्यानुसार सर्व वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करून 15 जानेवारी आचारसंहिता संपल्या नंतर या सर्व उमेदवारांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग केले केले जातील.




