Home Breaking News सवना ज. गावातील देशीदारु बंद होईल का?

सवना ज. गावातील देशीदारु बंद होईल का?

गावक-यांचा पोलीस प्रशासनाला प्रश्न?

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 मार्च 2026

सवना ज. हे गांव तालुक्यात चळवळीचे गांव म्हणुन प्रसिध्द आहे..परंतु सध्याअवस्थेत गावात देशी दारुचा महापुर आला आहे..अनाधिकृपणे देशी दारूचा धंदा जोमात सुरु आहे..अनेकांचे संसार उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. पोलीस प्रशासन मात्र ‘मी मारल्या वाणी करतो तु रडल्या वाणी कर’ अशीच अवस्था देशी दारू विक्रेते आणी पोलीस प्रशासनाची झाली आहे. आजप्रयंत हजारो वेळा पोलीस कार्यवाही झाली. परंतु सवना गावातील देशी दारुची बाटली अजुनतरी आडवी पडली नाही..कुठे पाणी मुरतंय हा जिवंत प्रश्न पोलीस प्रशासनाला सध्या सवना गावातील नागरीक विचारत आहेत…देशी दारूमुळे गावातील लहान लहान मुलं व्यसनाधिन होत आहेत..गावात विनाकारण भांडणतंटे निर्माण होत आहेत..अनेकांचे देशी दारूमुळे बळी जात आहेत..हि परिस्थीती सध्या हिमायतनगर तालुक्यात आहे..तरीही मात्र पोलीस प्रशासन कडक कार्यवाही देशी दारू अनाधिकृत विक्रेत्यांवर का? करत नाही? काय? गोड बंगाल आहे.असा प्रश्न सध्या नागरीक, महिला भगिनी विचारत आहेत..पोलीस प्रशासनाने गावातील देशी दारु बंद केली नाहीतर पुर्व आंदेगाव सारखी कार्यवाही गावकरी देशीदारु विक्रेत्यांवर केल्यास आश्चर्य वाटु नये..हिच अपेक्षा गावक-यांनी व्यक्त केली आहे..

Previous articleतहसीलमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची तयारी वेगाने सुरू!*
Next articleशेतीवरील वाढता खर्च, मार्गदर्शनाचा अभाव यासाठी शेतक-यांना प्रशिक्षणांची नितांत गरज आहे..