Home Breaking News *नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के* 

*नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के* 

*नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- ११ एप्रिल:- नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर व ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील काही गावांमध्ये आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08:45 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती.

त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08.45 Hrs. वाजता या धक्क्याची नोंद झाली असून या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 एवढी नोंदविण्यात आली असून, याचा केंद्रबिंदु हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावाच्या उत्तरेला असल्याचे कळते.

सदर धक्का हा सौम्य प्रकारचा आहे . तसेच या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत संबंधित तहसीलदार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.

याबाबत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत प्रशासनाशी आपण संपर्कात असून नागरिकांनी सतर्क राहावे,घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तर नागरिकांनी सतर्क राहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे.

आज सकाळी 8 वाजून 45 मिनिटाला 4.7 रिस्टेल सेक्टरचा भूकंप हिंगोली, नांदेड आणि परभणी

Previous articleमौजे किनी येथील सौ. सुजाता त्रिपनरेडी मुत्यलवाड यांना जिल्हा मध्यवर्ती बॅकेला मतदानाचा सर्वानुमते दिला अधिकार .‌…
Next articleजिल्हयात सर्वत्र भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..