👉 शेतक-यांचे *मरण* ठरते व्यापा-यांच *अर्थकारण*!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 15 हे 2026
कृषिप्रधान भारत देशात भारतीय शेतक-यांची अवस्था पाहुन देशातील अर्थतज्ञाला.. शेतक-यांच्या शेतीत पिकविलेला मालाचा बि पेरणीपासुन ते काढणीप्रयंत …व बाजारातील भाव (दर) यांचा अंदाज गेल्या 75 वर्षात कधीच कुणी लावता आला नाही हि खरी शोकांतिका आहे..
हळद शेतक-यांचे नगदी पिक म्हणुन दोन वर्षांतील एकुण शेतक-यांपैकी किमान पाच टक्के शेतक-यांना हळद साथ दिली असंच म्हणाव लागेल…उर्वरीत 95% टक्के शेतक-यांच नियोजन फिस्कटले की, हळद पिकांची विक्री करेपर्यंत नियोजन फिस्कटलेले असते…त्यात शेतक-यांचा दोष नाही…तो व्याप्या-यांचा आहे…
सुरुवातीला हळद 14,000/- रुपये होती…आजच का? 12000/- हजार झाली…हा शोध सरकारने लावला पाहिजे..
आमच्या हिमायतनगर तालुक्याची परिस्थीती वेगळी आहे…किमान पन्नास ते साठ भुसार मालाचे व्यापारी म्हणुन ज्यांनी कृ.उ.बा. समितीकडुन ओरीजलन लायसन्स काढले आहेत….पण हळद खरेदी करणारे व्यापारी केवळ तिनच आहेत…हि सत्यता शेतक-यांनी बोलुन दाखविली आहे..एकाची भाव तर मालात कटी यातच माझा बळीराजा गुदमरुन मरतो आहे…महाराष्ट् शासनाने शेतक-यांची हळद खरेदी केंद्र सुरु करुन शेतक-यांना दिलासा देण्यात यावा अशी अशी मागणी शेतकरी करीत आहेत…



