Home Breaking News ताडोबा‌ येथील प.पु भंन्ते ज्ञानज्योती महास्थविर यांचे लोहारा येथे जंगी स्वागत, जय...

ताडोबा‌ येथील प.पु भंन्ते ज्ञानज्योती महास्थविर यांचे लोहारा येथे जंगी स्वागत, जय भिम च्या घोषणाने दुमदुमला परिसर 

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे 

बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे ताडोबा अभयारण्यातील भंन्ते ज्ञानज्योती महास्थविर व त्यांच्या संघाचे जंगी स्वागत करण्यात आले .भदंत ज्ञानज्योती महास्थविर हे एक प्रसिद्ध बौद्ध भिक्खु आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते महाराष्ट्रात आणि देशभरात बुद्ध धम्माचा प्रचार, प्रसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन करण्याचे कार्य करतात.त्यांच्या कार्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:धम्म पदयात्रा: धम्म, समता आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी ते विविध पदयात्रांचे आयोजन व नेतृत्व करतात. उदाहरणार्थ,

त्यांनी मुक्तीभूमी (येवला) ते त्रिरश्मी लेणी (नाशिक) अशा भव्य पदयात्रांचे यशस्वी आयोजन केले आहे.संघरामगिरी चंद्रपूर येथील ताडोबा अभयारण्य परिसरात ‘संघरामगिरी’ येथे त्यांचे मुख्य केंद्र आहे, जिथे ते धम्म शिकवणी देतात.प्रवचन आणि ध्यान: ते विपश्यना आणि धम्म प्रवचनांच्या माध्यमातून (जसे की देव संकल्पना, चार सर्प मैत्री) लोकांना मार्गदर्शन करतात.बाल श्रमणेर शिबिरे: लहान मुलांमध्ये बौद्ध धम्म आणि श्रमण संस्कृती रुजावी यासाठी ते नियमितपणे बाल श्रमणेर शिबिरे आयोजित करतात. असे अनेक कार्य त्यांचे आहे.आज जलंब ते पातुर्डा पायी धम्मयात्रा निघाली आहे. आपला पायी धम्मयात्रेच्या वेळातुनवेळ काढून लोहारा गावातील महिला संघाच्या दिलेला वेळ हा सोन्याचा वेळ झाला असे येथील नागरिकांचे व सर्व महिला संघांचे म्हणणे आहे. यावेळी उपस्थित म्हणून भन्ते ज्ञानज्योती महास्थविर, भन्ते डॉ. धम्मचेती उपस्थित होते.

Previous articleनांदेड विधानपरिषदेसाठी पहिला अर्ज कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या नावाने; राजकीय वर्तुळात खळबळ..