(देगांव / ५ सप्टेंबर ) – पिढ्यांन पिढ्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा उजेड पेरणाऱ्या शिक्षकांचे महान कार्य खरोखर कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. अशोक शिरसाट यांनी केले. ५ सप्टेंबर हया ‘ शिक्षक दिनानिमीत्त आयोजित बाळापूर तालुक्यांतील देगांवच्या जि.प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा येथे आयोजित सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभा प्रसंगी डॉ. शिरसाट बोलत होते.डॉ.अशोक शिरसाट यांचेसह गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शानदार सत्कार करण्यांत आला. विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव कोगदे ,माजी आमदार मा.गजाननराव दाळू गुरूजी, पं.स. सभापती शारदाताई सोनटक्के, ग्राम पंचायत सरपंच दिपालीताई सरदार, ग्रामसेवक रविन्द्रजी इंगळे, उपसरपंच पुष्पाताई भाकरे , शाळेचे मुख्याध्यापक दिनेशजी ठाकरे , शाळा समिती अध्यक्षा निर्मलाताई अंभोरे , यशस्वी उद्योजक एकनाथराव दुधे शेठ , सौ. दुधेताई, उमेशजी भुसारी, गटविकास अधिकारी मिलींदजी मोरे , शिवाजीराव पाटील , सहदेवराव आसोलकर , पत्रकार उमेशभाऊ म्हैसने ,गोपाल भाऊ मानकर , राजेश भाटे, बाळासाहेब लोध, बडवे भाऊसाहेब आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी भारताचे पहिले उपराष्ट्रपती व देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निष्ठापूर्वक कार्यभार सांभाळणारे दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या दिव्य प्रतिमेस हारार्पण करण्यांत आले. याप्रसंगी मा.एकनाथजी दुधे सेठ यांच्या मातोश्री कालकथित बहिणाबाई उकर्डाजी दुधे यांच्या स्मरणार्थ बांधण्यांत आलेल्या शाळेच्या कमानीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आले. या शानदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिनेशजी ठाकरे यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणें झालीत. गुरूवर्य दिनकर मोतीराम मानकर , पांडुरंग भगत, डिगांबर म्हैसने, रामदास सोनटक्के , शेषराव नावकार, दिलीप इंगळे, प्रभाकर रेवास्कर , किसन जाधव , डॉ.अशोक शिरसाट , सारंगधर आसोलकार आदि सेवानिवृत्त शिक्षकांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. शाळेचे शिक्षकवृंद ,समस्त प्रतिष्ठीत नागरिक या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुर म्हैसने यांनी केले तर आभार प्रदर्शनाची धुरा शिवाजीराव पाटील यांनी सांभाळली.
Home Breaking News पिढ्यांन पिढयांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा उजेड पेरणाऱ्या शिक्षकांचे महान कार्य….डॉ. अशोक शिरसाट