हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधुंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून, राज्य शासनाने या आंदोलनाचा धसका घेऊन ; हिंदी भाषेच्या सक्ती चा GR अखेर रद्द केला. या निमित्ताने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहराच्या वतीने मराठी भाषेचा विजय झाला असून मराठी भाषेच्या एकजुटीचा हा विजय ढोल वाजून, पेढे वाटून जल्लोषात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी बोलतांना प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांनी हा विजय मराठी अस्मितेचा असून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी केलेल्या राज्य सरकारच्या अनाठाई निर्णयाला विरोधाचा हा विजय आहे. ५ जुलै ला होणाऱ्या मोर्चाला यश मिळेल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्याने हा GR रद्द करावा लागला.या पुढे जेव्हा जेव्हा मराठी भाषेला मराठी माणसाला गृहीत धरले जाईल त्या प्रत्येक वेळी या पद्धतीने कडकडून विरोध केला जाईल.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील,प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे,महिला सेना उपाध्यक्ष सुजाता ताई डेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील,संदिप किर्वे,मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे,सचिन सिन्हा,नितीन माळी,बंटी कोरडे,योगेश दाभाडे,धीरज भोसले, संदिप दोंदे , शहरउपाध्यक्ष विशाल भावले ,मिलिंद कांबळे,गणेश जायभावे,ज्ञानेश्वर बगडे,विजय ठाकरे,किशोर वडजे,सचिन रोजेकर,अर्जुन वेताळ,प्रफुल बनभेरू,सौरभ खैरनार,राकेश परदेशी,जावेद शेख,विश्वास तांबे ,
कौशल पाटील,राहुल पाटील, अरुणा पाटील,कामिनी दोंदे ,स्वागता उपासानि,पद्मिनी वारे,भानुमती आहिरे,रागिणी कोदे,मिरा आवारे,कविता कुकारणी,प्रीती आव्हाड,गोपी पगार,संदिप दराडे ,संदिप मालवणकर, उदय नवले,अमोल गोजरे , सुजीत बडगुजर, वैभव रौंदल,धरम गोविंद,नितीन सूर्यवंशी,लक्षमण साळवे,जनार्दन खाडे,विशाल चौधरी, हर्शल कुलकर्णी, पदाधिकारी व मनसे सैनिक तसेच मराठीन प्रेमी उपस्थित होते.



