Home Breaking News व्याळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महिलांच्या सक्षमीकरणावर भर

व्याळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महिलांच्या सक्षमीकरणावर भर

संतोष मोरे बाळापूर तालुका प्रतिनिधी 

:- आज दिनांक ८ मार्च २०२६ रोजी, व्याळा प्रभाग बाळापूर मधील सावित्रीबाई महिला प्रभाग संघाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभागसंघ अध्यक्षा संगीताताई बायस्कर आणि तालुका अभियान व्यवस्थापक श्री. नितीन हरने सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात

दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून सुरुवात केली .सरपंच गजाननभाऊ वाझिरे, ग्रामविकास अधिकारी सुनील इंगळे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. मार्गदर्शन: सरपंच गजाननभाऊ वाझिरे यांनी महिलांना शुभेच्छा देताना म्हटले की प्रत्येक स्त्रीला तिच्या कर्तुत्वाला नेतृत्वाला, सहनशक्तीला, त्यागाला आणि प्रेमाला माझा सलाम.महिलांनी प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभागी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच गावातील ग्रामसंघांना कार्यालय उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.शासकीय योजनांची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील इंगळे यांनी महिलांचा प्रत्येक क्षेत्रातील वाढता सहभाग अधोरेखित केला. प्रभाग समन्वयक गोपाल भाकरे यांनी ‘उमेद’ अभियानांतर्गत मिळणाऱ्या संधी आणि योजनांची सविस्तर माहिती दिली.आरोग्य तपासणी शिबिर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कोमल वाऱोकार यांच्या आयोजनातून महिलांसाठी आरोग्य तपासणी कॅम्प घेण्यात आला. गावातील बहुसंख्य महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.उपस्थित मान्यवर व पदाधिकारी या सोहळ्याला प्रभागसंघ पदाधिकारी संगीताताई बायस्कर, शोभा राऊत, सर्व ग्रामसंघ पदाधिकारी, ग्रामसखी आणि बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभागसंघ व्यवस्थापक रुपाली इंगळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.सावित्रीबाई महिला प्रभागसंघ आहे लय भारी,

आदर्श गाव संस्कारी कुटुंब सक्षम आहे नारी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ‌. ‌. ‌.

Previous articleकुंभमेळाच्या धर्तीवर रामकुंड पंचवटी अहिल्याघाट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे वंशजा कडून मागणी
Next articleतहसीलमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची तयारी वेगाने सुरू!*