Home Breaking News नाट्यसंपदा राज्यस्तरीय स्पर्धाचे नाशिक मध्ये 16 ऑक्टोंबर रोजी आयोजन

नाट्यसंपदा राज्यस्तरीय स्पर्धाचे नाशिक मध्ये 16 ऑक्टोंबर रोजी आयोजन

राज्यस्तरीय एकल नृत्य स्पर्धाचाही समावेश

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, सै.स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ ऑपलाईड आर्टस परफॉर्मिंग आर्टस अँन्ड फैशन डिझा ईन, पंचवटी, नाशिक आणि मधु रा वुमन एम्पॉवरमेंट अँन्ड वेलफेअर ट्रस्ट नाशिक यांच्या तर्फे मा. संपदा हिरे यांच्या वाढदिवसा निमित्त नृत्यसंपदा राज्यस्तरीय एकल कथक नृत्य स्पर्धा व नाट्य संपदा राज्यस्तरी य एकपात्री अभिनय स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.15 ते 25 वयोगटातील स्पर्धकांन साठी ही स्पर्धा असून कलाक्षेत्रात उद्योन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळावे हा या स्पर्धाचा मुख्य हेतू आहे.सदर स्पर्धा हि 16 ऑक्टोंबर 2022 रविवार रोजी लोकनेते व्यकंटराव हिरे महाविद्यालय येथे संपन्न होणार आहेत.
विजेत्याना रोख रक्कम बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.तरी या स्पर्धा मध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख दि.13 ऑक्टोंबर रोजी पर्यंत आहे.आधिकाधिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकां वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहिती करीता संपर्क प्रा. प्रवीण जाधव मो.9445145163 व संतोष आहिरे मो.7066745308यांना संपर्क करावा.

Previous article*रावणदहन केल्याने भाजपच्या आमदारांवर गुन्हा नोंद होणे, हे लज्जास्पद ! – अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना*
Next articleमातंग समाजातील युवकांनी व्यवसायाकडे वळावे..:- ज्ञानदेवराव मानवतकर