Home Breaking News चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहालात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव जल्लोत्सात साजरा

चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहालात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव जल्लोत्सात साजरा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

ईतिहासातील श्रद्धा स्थानांना जाती पातीत अडकवू नका-मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू.

चांदवड- दिनांक 26मार्च 2023 रोजी चांदवड च्या ऐतिहासिक रंगमहालात मराठेशाहीचा पताका उत्तरेत व अटकेपार फडकवणारे सुभेदार मल्हार राव होळकर यांची जयंती मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात साजरी झाली.
या वेळी बोलतांना राज्याचे माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सुभेदार मल्हार राव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्वराज्य व धर्म रक्षणासाठी केलेले काम अधोरेखित केले.या महापुरुषांनी कुण्या एका जातीसाठी काम केले नसून सर्व समाजाच्या विकासासाठी त्यांचे योगदान राहिले. आज आपण महापुरुषांची जाती पाहायला वाटणी करून त्यांचे कर्तृत्व एका समाजापुरते ठेवत असल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच आयोजकांनी हा नियोजनबद्ध महोत्सव सोहळा साजरा केला आणि इतकी मोठी भव्यता या सोहळ्यासाठी दिसून येते यातच या सोहळ्याचे यश दिसते यामध्ये अनेक प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम साहसी खेळ शस्त्र प्रदर्शन एक पात्री नाटक असे अनेक प्रकारचे नियोजन केले आणि हा ऐतिहासिक वास्तू उजेडात आणली त्यांनी मन भरून कौतुक केले व त्यांनी केलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी शब्द दिले त्यात अहिल्यासृष्टी, अश्वरुड स्मारक, व प्रशासनात तरबेज असलेल्या अहिल्यामातेचा एक स्मारक प्रशासकीय आवारात व्हावे हे पुढील दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यामध्ये या सोहळ्याचे भव्यता बघून सर्व जनता भावुक झाली. या वास्तूमध्ये प्रथमच हा सोहळा पार पडला आणि त्यामुळे त्या वास्तूला एक भव्यता प्राप्त झाली याचाही उल्लेख या ठिकाणी बच्चू कडू यांनी केला या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मराठा विद्या प्रसार मंडळाचे सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड होतो तर प्रमुख उपस्थितांमध्ये , नगरपालिकेचे अध्यक्ष  भूषण कासलीवाल अशोक व्यवहारे, प्रहार चे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू भाऊ बोडके शिवाजी दादा ढेपले आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार म्हणून सरपंच रंगनाथ थोरात, गणूर सरपंच  बाळू सोनवणे, ,माजी उप जिल्हाआधीकारी देवीदास चौधरी, खंडेराव पाटील,  विनायक काळदाते,मार्केट कमिटी संचालक विक्रमबाबा मार्कंड,येवले मार्केट कमिटी उप सभापती गणपतराव कांदळकर, येवले खरेदी विक्री संघ मा.सभापती दत्तात्रय वैद्य सर, दत्तू देवरे उद्योगपती भास्करराव जाधव,पिंपळगाव धाबळी मा.सरपंच  नवनाथ जाधव व मान्यवर उपस्थित होते.समाधान बागल यांनी स्वागत केले तर . गणेश निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच सुहास सुरळीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Previous articleसर्वात मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द
Next articleहिमायतनगर शहरात श्री. रामनवमी चे बॅनर फाडल्याचा प्रकार….