Home कृषीजागर हिमायतनगर तालुक्यात ढगफुटी पावसाने हजारो हेक्टर पिकांचे खरडुन नुकसान….* शेतकरी चिंताग्रस्त

हिमायतनगर तालुक्यात ढगफुटी पावसाने हजारो हेक्टर पिकांचे खरडुन नुकसान….* शेतकरी चिंताग्रस्त

नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे..

हि.नगर ग्रामीण ता.प्रतिनीधी
/माधव काईतवाड बोरगडीकर:-हिमायतनगर:-हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हा पुर्ण तालुक्यात दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. दि.20/7/2023रोजी दिवसभर रिमझिम पाऊस चालू होता.रात्री 9 च्या नंतर वादळीवाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात ढगफुटी झाली. रात्र भर पाऊस पडला.या पावसाने काही क्षणातच होत्याच नव्हत झालं.हा पाऊस तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी, धानोरा,कारला, वारंग टाकळी, मंगरूळ,सिबदरा, वडगाव,खैरगाव,सवना,
सिरंजनी,कोठा,एकंबा,
पळसपुर,डोल्हारी,सह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये ढगफुटी पाऊस झाला.यामुळे कोवळ्या वयात असलेले पिक शेतातील कालवे ,नाले, ओढे, नदी फुटुन जमिनी खरडल्या नुसत्या जमिनीचं खरडल्या नाही तर त्यात पेरलेल्या पिकांनाही खरडुन नेले, तालुक्यातील एक-दोन एकर नाही तर हजारो हेक्टर जमीनी खरडल्या त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे शेती व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करुन शेतकऱ्यांना धिर द्यावा.त्याच बरोबर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे.अनेक कुटुंबांचे पावसामुळे घरांचे नुकसान झाले.अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य,जिवणावश्यक वस्तु भिजुन नुकसान झाले त्यामुळे अनेक कुटुबांचा संसार उघड्यावर आला. तालुक्यातील चिंताग्रस्त शेतकरी व घरांची पडझड झालेल्या कुटुंबातील वर्गातून होत आहे..

Previous articleगांधीग्राम पुलाच्या निधी अपव्यय व अपहार प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीची दहिहांडा पोलिस स्टेशन ला तक्रार
Next articleदेशाच्या सिमेवर सेवा करणा-या जवानाचे घर घाणीच्या विळख्यात.