Home Breaking News देशाच्या सिमेवर सेवा करणा-या जवानाचे घर घाणीच्या विळख्यात.

देशाच्या सिमेवर सेवा करणा-या जवानाचे घर घाणीच्या विळख्यात.

???? नगरपंचायतचे कमालीचे दुर्लक्ष.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 25 जुलै 2023:-देशाच्या सिमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून, जम्मू काश्मीर येथे भारतीय जवान मोहन गोणारे यांचे रेल्वेस्टेशन हिमायतनगर येथील गल्लीतील घरासभोवताली प्रचंड पाणी साचुन, मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. अश्या परिस्थितीत त्यांचे कुटुंबीय राहत आहे. परंतु देशसेवेसाठी सेवा करणा-या जवणाच्या घराभोवतलची साफसफाई करण्यासाठी हिमायतनगर नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे.

आपल्या जिवाची पर्वा न करता भारत मातेच्या सेवेत आपण आपल्या घरापासून लाखोदुर अंतरावर आपण आहोत. परंतु आपल्या घरासमोरील घाणीचे साम्राज्य पाहुन, त्यांना दुःख झाले आहे. त्यांनी एका वाॅटसाफ ग्रुपवर फोटो टाकुन, नगरपंचायतीच्या ढिसाळपणाचे लक्ष वेधले आहे.
भारतीय जवान मोहन गोणारे यांच्या घराभोवतालची साफसफाई नगरपंचायत लवकर करेल. हिच त्यांची आणी जनसामान्यांची अपेक्षा आहे.

Previous articleहिमायतनगर तालुक्यात ढगफुटी पावसाने हजारो हेक्टर पिकांचे खरडुन नुकसान….* शेतकरी चिंताग्रस्त
Next articleशेकडो हेक्टर वरील पीके पाण्याखाली.