Home Breaking News प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन

प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन

योगेश घायवट;पहिल्या श्रावण सोमवार निमित्त वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते राजराजेश्वराच्या चरणी

अकोला- श्रावण महिन्यातील सोमवारांना विशेष महत्त्व आहे. दि. 21 ऑगस्ट रोजी या श्रावणातील पहिला सोमवार असल्याने या निमित्तावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. सौ. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोल्यातील सुप्रसिद्ध राज राजेश्वर मंदिर येथे जाऊन राजराजेश्वराचे दर्शन घेतले. हार, फुले अर्पण करून राजराजेश्वराची पूजा-अर्चना केली. शेतकरी, कामगार, मजूर, नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य लोकांना सुखी ठेवण्यासाठी व अकोलेकरांवरील सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी यावेळी प्रार्थना केली.
पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा राज राजेश्वराचे आशीर्वाद घेतले. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, बालमुकुंद भिरड, राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अढाऊ, जि. प. सभापती सौ. योगिताताई रोकडे, ओबीसी नेते प्रा. संतोष हुसे, एडवोकेट संतोष रहाटे, निलेशजी देव यांच्यासह यावेळी श्रीकांत घोगरे, आशिष मांगुळकर, दादाराव पवार, स्वप्निल आखरे, श्रीकृष्ण देवकुंभे, राज राजेश्वर मंदिराचे गजानन घुगे, अभ्यंकर काका, एडवोकेट राम भवरकर, अण्णा अभ्यंकर, गजानन घोंगे, एडवोकेट आय.एस. ठाकरे, यांची यावेळी उपस्थिती होती

Previous articleराष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाची शेगाव येथे बैठक संपन्न
Next articleजागतिक आणि आता अंतराळ दोन्ही व्यापणारे !—राजेंद्र पातोडे अकोला