Home Breaking News आरोग्य, पाणी, विज आणी शेतक-यांची कामे प्राधान्याने करण्याचा नवनिर्वाचित आमदारांचा निर्धार.

आरोग्य, पाणी, विज आणी शेतक-यांची कामे प्राधान्याने करण्याचा नवनिर्वाचित आमदारांचा निर्धार.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 नोहेबर 2024

राज्यात महायुतीला प्रचंड जनादेश मिळाला असल्याने, हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे हिमायतनगर येथे मतदारांचे श्रणनिदेश व्यक्त करण्यासाठी आले असता त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. विधानसभेची निवडणुक मोठ्या मताधिक्याने जिंकल्याने प्रथमच हिमायतनगर येथे त्यांनी भेट दिली. श्री परमेश्वर मंदिर येथे सत्कार समारंभ पार पडला. आपल्या मनोगतात ते म्हणाले हिमायतनगर येथील शेतक-यांचा विजेचा प्रश्न गंभिर आहे. मी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे सोनारी फाटा येथे 132 के. व्ही. विज केंद्राची मागणी केली होती. ती मंजुर करण्यात आली. हिमायतनगर शहरातील तालुका आरोग्य केद्र येथे धुळखात पडलेल्या ज्या काही मशीन आहेत. त्याची दुरुस्ती करुन दवाखान्यातील पुर्ण स्टाफ भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच नागरीकांच्या आरोग्य स्वच्छ राहण्यासाठी बंदिस्त नाल्यांची नितांत गरज आहे. लवकरच नगरपंचायतची बैठक लावुन तेही काम पुर्ण करु. तसेच आपल्या लाडक्या बहिणीसाठी पैसे काढण्यासाठी गैरसोय होत असल्याने मी अमरावतीचे माझे मित्र चेअरमन यांना बोललो आहे. लवकरच महाराष्ट्र ग्रामीण बॅकेची दुसरी सुरु करण्याचे नवनिर्वाचित आमदार साहेबांनी सांगितले. यावेळी श्री परमेश्वर मंदिर टृस्टचे उपाध्यक्ष महाविरशेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंतराव देवकते, संचालक वानखेडे मामा, दिनेश राठोड, गजानन हर्डीकर, प्रदिप जाधव, रामभाऊ सुर्यवंशी , रामेश्वर पाकलवाड, परशुराम विठलवाड, काशीबाई गायकवाड आदी हिमायतनगर तालुक्यातील चाहते, पदाधिकारी , लाडक्या बहिणी आवर्जुन उपस्थीत होत्या.

Previous articleआता जनतेचा 5 वर्ष सालगडी म्हणून काम करणार 
Next articleदर्जाहिन कामे नको