मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 03 फेब्रुवारी 2026
समाज परिवर्तनाचे शिल्पकार, अभ्यासु राजकारणी
“समाजाचा विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही” हा विचार केवळ बोलून न थांबवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे शिक्षणमहर्षी, माजी आमदार स्व. बापुरावजी पाटील आष्टीकर साहेब हे हदगाव–हिमायतनगर तालुक्याच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील दीपस्तंभ होते.
दुर्गम भागातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे उभारून त्यांनी ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचवली. शिक्षणामुळेच पिढ्या घडतात आणि समाज सक्षम होतो, हा त्यांचा ठाम विश्वास होता.
लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नेहमीच शिक्षण, समाजसेवा आणि नैतिक मूल्यांना प्राधान्य दिले. सत्ता ही सेवा करण्याचे साधन आहे, हा आदर्श त्यांनी आयुष्यभर जपला. आज हदगाव–हिमायतनगर परिसरात दिसणारी शैक्षणिक प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे.
त्यांनी घालून दिलेला सामाजिक व शैक्षणिक वारसा आज त्यांचे सुपुत्र, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. नागेश पाटील आष्टीकर साहेब जनसेवेच्या माध्यमातून समर्थपणे पुढे नेत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत, शिक्षण व विकासाला प्राधान्य देण्याची परंपरा ते जपत आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे.
आज त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांच्या विचारांना उजाळा देत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
शिक्षणमहर्षी स्व. बापुरावजी पाटील आष्टीकर साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!! 💐
संजय काईतवाड शिवसेना (उबाठा) हिमायतनगर तालुका प्रमुख




