Home Breaking News जय भिम च्या घोषणांनी लोहारा परिसर दुमदुमला 

जय भिम च्या घोषणांनी लोहारा परिसर दुमदुमला 

भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे

बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील सात हि तालुका जय भिम च्या घोषणांनी दुमदुमला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती देशभरात साजरी होत आहे.

भारतीय संविधानचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीच्या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटीश सैन्यात सुभेदार होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांची यंदा 135 वी जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त संपुर्ण अकोला जिल्हा भव्य रॅली ,सांस्कृतिक कार्यक्रम,आणि अभिवादन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही जयंती समता आणि ज्ञानाचा उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. लोहारा येथील विश्र्वशांती बुध्द विहार, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा मराठी, ग्रामपंचायत येथे सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपुर्ण लोहारा गावातुन भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकिची सांगता बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजु मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून महिला संघ , युवा मित्र मंडळ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजिल्हयात सर्वत्र भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..
Next articleएन.एस.ओ. व आय.एम.ओ या परीक्षेत गणेश आलेवाड यांचे यश..