Home Breaking News शेतक-यांच मरण किती स्वस्त होऊन बसलंय

शेतक-यांच मरण किती स्वस्त होऊन बसलंय

👉 *वास्तव*

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24/08/2025

अतिवृष्टीच्या विळख्यात सापडलेला शेतकरी आता मोठमोठ्या जनावरांच्या विळख्यात सापडतोय…म्हणतात *ना…देव तारी…त्याला कोण? मारी*

हिमायतनगर तालुक्यातील मुगाच्या शेंगा तोडणीला सुरुवात झाली आहे.

पोटा बु. येथील टोल नाक्या जवळील मुगाच्या शेतातील मुग तोडणी करणा-या महिला दैनंदिन शेतातील कामे करत असतांनाच मुगाच्या शेंगा तोडतांना त्यांना मला मोठा अजगर दिसला आहे. सुदेवाने हा अजगर मुगाच्या शेतातुन किनवट-नांदेड रोडवर येऊन थांबला…

शेतक-यांना आल्या शेतातील दैनंदिन कामे करत असतांना कधी साप, विंचु, रानडुकरे, वानरे आदी जंगली प्राण्यापासुन बचाव करुन आपली शेती कसावी लागते..कधी महापुर तर कोरडा दुष्काळ अश्या एक नाहीतर अनेक संकटाशी सामना करावा लागतो..शासन शेतक-यांना जनावरांने हल्ला गेल्यास, साप चाऊन मृत्युमुखी पडल्यास तुटपुंजी मदत करते….पण आज रोजी अतिवृष्टी अतिवृष्टिने शेतातील पिकाचे नुकसान प्रचंड झाले आहे. तरी अजुन शेतक-यांना अर्थिक मदत जाहीर केली नाही…शेतक-यांची संकटे पाट सोडत नाहीत…संकटांची मालीका संपत नाही….शेतकरी जिवंत बघायचा असेल तर शासनाने शेतक-यांची कर्जमाफी व आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे..अशी शेतक-यांच्या भावना आहेत….नाहीतर शेतक-यांच मरण स्वस्त होऊन बसलंय…हे वाक्य म्हणण्याची वेळ येऊ नये मात्र झालं…..

तरी सर्व शेतकरी बांधवानी सांभाळून आपल्या शेतात सोयाबिन फवारणी पायात बुट घालुनच करावी.

Previous articleअतिवृष्टीच्या तडाख्यातुन सावरत बळीराजाने साजरा केला बैलपोळा.
Next articleखरीप ई-पिक पाहणीचे अॅप चालत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त.