शासकीय योजनांची माहिती व नागरिकांना लाभ देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674
जलंब:येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन जलंब येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुधीर खांदे अपार जिल्हाधिकारी बुलढाणा प्रमुख पाहुणे श्री सदाशिव शेलार उपजिल्हाधिकारी पुनवर्सन विभाग बुलढाणा कु.प्रज्ञा काकडे तहसिलदार शेगाव अविनाश ढोरे सहाय्यक सहकार अधिकारी शेगाव डॉ.नेहा अग्रवाल P.H.C जलंब वैशाली राठोड ग्रामसेविका जलंब वैशाली हेलोडे सरपंच जलंब श्री गजानन काळे प्राध्यापक श्री पाई विद्यालय जलंब अनिल सोनटक्के सर रामेश्वर मोहे महादेव मिरगे मान्यवर उपस्थित होते. या वेळी विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
या शिबिरामुळे गावातील नागरिकांना 407 दाखल्याचा लाभ मिळाला नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एका ठिकाणी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले यावेळी या अभियानात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते..




