Home राजकारण १३ जुलै रोजी जिल्हा परिषद , पंचायत समितीचे आरक्षण सोडत होणार जाहीर…

१३ जुलै रोजी जिल्हा परिषद , पंचायत समितीचे आरक्षण सोडत होणार जाहीर…

👉🏻सरासम गटातील जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार लागले कामाला…..

👉🏻 सोडत कडे सर्वांचे लागले लक्ष……..

हिमायतनगर /-कृष्णा राठोड
सध्या सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच जिल्हा परिषद म्हणजे विधानसभेचे मिनी मंत्रालय असे समजले जाते त्याच मंत्रालयात आपण जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करणारे उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत हिमायतनगर तालुक्यात सध्या तीन जिल्हा परिषद आहेत त्यापैकी एक व महत्वाची समजली जाणारी सरसम बु येथील जिल्हा परिषद गटातील काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस सह इतर मित्र पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी आपापल्या पक्षश्रेष्ठीकडे गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली असल्याचे पाहायला मिळत आहे तर एकीकडे दिनांक 13 जुलै रोजी सोडण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षनाकडे मतदार संघाचे लक्ष लागून आहे.

Bhumiraja news!
हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचे एक हाती वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे तर ह्याच मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा चांगलाच जम असल्याचे पाहायला मिळते तर एकीकडे बंडखोर सेनानेते बाबुराव कदम यांचा सुद्धा एक गट या मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात घडत असलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा फायदा येथील बाबुराव गट घेईल का ? जर का असे झाल्यास त्याचा फायदा येथील काँग्रेस पक्षाला होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे ? त्यामुळे सरसम बु.मतदार संघाचे सुधारित राजकीय शेत्र पवना ,पवना तांडा, एकघरी, रमणवाडी, पारडी, टेंभी, आंदेगाव, दरेसरसम, भीशाची वाडी, अमरहिरा तांडा ,सोनारी ,करंजी, खडकी बा, घारापूर, रेणापूर, दिघी, वीरसनी ,पिपरी ,टेंभुर्णी ,पाहूनमारी, वाघी,सह किरंमगाव या गावाचे राजकीय क्षेत्र असल्यामुळे बहुतांश ठिकाणचा विचार करायचा ठरल्यास या मतदारसंघात मराठा मतदार संख्या जास्त असल्याने ही जिल्हा परिषद येत्या 13 जुलै रोजी सर्वसाधारण ला सुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या मतदारसंघातील अनेक दिग्गज इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढविण्यासाठी कामाला लागले असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे त्यातच काँग्रेस पक्षाचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सरसम ग्रामपंचायतचे उपसरपंच अतुल वानखेडे, वाघी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील माने, करंजी येथील आदर्श शिक्षक सूर्यवंशी सर व नांदेड जिल्ह्यात टेंभुर्णी हे गाव हागणदारी मुक्त करणारे आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर हे काँग्रेस कडून सर सम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर शिवसेनेचे सर्वेसर्वा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे विश्वासू करंजी येथील शिवसेना गटप्रमुख दत्ताराम पाटील करंजीकर, मारोतराव मोरे, वाघी येथील श्रीराम पाटील माने, माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना आदिवासी तालुकाप्रमुख सत्यवत ढोले, सरसम येथील ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी राम गुंडेकर हे सुद्धा शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समजली जात आहे तर एकीकडे लोकनेते बाबुराव कोहळीकरांचा एक गट असल्याने या गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील देशमुख व करंजी येथील ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड हे इच्छुक आहेत तर भारतीय जनता पार्टी कडून भाजपा जिल्हा सरचिटणीस व हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुधाकर पाटील सोनारीकर, ओबीसी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर शेवाळे व भाजपा मध्ये नुकताच प्रवेश केलेले आंदेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर पाकलवाड व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता व विद्यार्थी चळवळीचे नेते धम्मा वाढवे हे सुद्धा सरसम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या सर्वांचे लक्ष दि 13 जुले रोजी सोडण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाकडे लागले आहे त्यामुळे या सर्वांचे भवितव्य या आरक्षणावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार व प्रतिष्ठेची समजल्या जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा📲९१४५०४३३८१

भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड बोरगडीकर

Previous articleपूर्णेतील “त्या” रेल्वे भुयारी पुलाखालच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याची
Next articleमरसूळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य! वाहतूक ठप्प झाल्याने शेतकरी वैतागले!!