हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर 8983319070
नितीन नबीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार हे जवळ पास निश्चित झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय निवडणुक अधिकारी के. लक्मण यांनी घोषणा केली कि नवीन यांच्या समर्थनार्थ 37 नामांकन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. छाननी नंतर सर्व नामांकन वैध असल्याचे आडळू न आले. माघार घेण्याची मुदत संपल्या नंतर नितीन नबीन हे एकमेव उमेदवार राहिले आहेत. आज त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील समारंभास उपस्थित राहु शकतात.
नितीन नबीन यांच्या अध्यक्ष पद निवडी मुळे नवीन राष्ट्रीय कार्यकारणी बाबत चर्चा तीव्र झाल्या आहेत. योगायोगाने भाजपाच्या स्थापणेच्या 46 व्या वर्षात पार्टीची जबाबदारी घेणारे सर्वात तरुण व्यक्ती नितीन नवीन ( 45 वर्षे ) आहेत.
नितीन नबीन हे वयाच्या 26 व्या वर्षी पहिल्यादा आमदार झाले. ते बिहार मधील पहिले भाजप अध्यक्ष आहेत. त्यांनी भाजपा युवा मोर्चा पासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2006 मध्ये त्यांचे वडील आणि भाजपाचे जेष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांच्या निधना नंतर त्यांची पाटना पश्चिम विधानसभा मतदार संघातून पोटनिवडणूक 60,000 मतांनी जिकली. नंतर त्यांनी बंकीपूर येथून सलग पाच निवडणुका जिंकल्या.




