Home Breaking News “SIR मोहिमेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी BLO चे मित्र होऊन लोकशाहीचे रक्षक बनावे”

“SIR मोहिमेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी BLO चे मित्र होऊन लोकशाहीचे रक्षक बनावे”

:- प्रकाश तायडे

भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण अभियान (SIR) अंतर्गत राबविण्यात येणारे अभियान हे मतदान जनजागृती व लोकांशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसला मिळालेली मोठी संधी असून, या संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी केले. ते आज अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित प्रमुख नेते व तालुका/शहर अध्यक्षांच्या SIR संदर्भातील कार्यशाळेत बोलत होते.

या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अशोकराव अमानकर, प्रशांत गावंडे व अविनाश उंबरकर उपस्थित होते. त्यांनी SIR संदर्भातील विविध बाबी बारकाईने समजावून सांगत प्रशासनाला सहकार्य करून या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तसेच SIR मोहिमेचे वेळापत्रक, प्रक्रिया व प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

वंचित, गरजू व दुर्लक्षित घटकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गावागावांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सजग राहून संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मार्गदर्शकांनी सांगितले.

बैठकीमध्ये जिल्ह्यातील तसेच शहरातील महत्त्वपूर्ण पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये एस.आय.आर. विषयावर सखोल व व्यापक चर्चा करण्यात आली.

बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तायडे, आमदार साजिद खान पठाण, महानगर अध्यक्ष महेंद्र गवई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव महेश गणगणे, काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अशोकराव अमानकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे, डॉ. सुधीर ढोणे तसेच एस.आय.आर. विषयावर सखोल मार्गदर्शन करणारे काँग्रेसचे नेते प्रशांत गावंडे, अविनाशजी उंबरकर व विजय तायडे उपस्थित होते.

याशिवाय तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश बेटकर, सारंग मालनी, अनोक राहणे, मो. खालिद, सत्यनारायणजी घाटोळे, मो. अक्रम, मुख्तार सर, संदीप देशमुख, विजय देशमुख, डॉ. अतुल काठोळे, मो. इरफान, प्रशांत देशमुख, मो. युसुफ, सुनील वानखडे, नागसेन शिरसाट, रमेश भगत, रवींद्र लांडे, गजानन काकड, अतुल खोटरे, अफरोज भाई, गजाननराव देशमुख, झहीर खान, सरपंच पांडुरंग ठक, डॉ. फैयाज अन्सारी, आत्माराम म्हात्रे, मोहसीन शहा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

बैठकीचे सूत्रसंचालन तसेच एस.आय.आर. मोहिमेच्या समन्वयाची जबाबदारी अतुल अमानकर यांच्याकडे सोपविण्यात आली. तसेच आभार प्रदर्शनही अतुल अमानकर यांनी केले.

Previous articleअहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय नया अंदूरा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात संपन्न