Home Breaking News हिमायतनगर तालुका कृषि कार्यालयात मंडळ कृषि अधिकारी सिडाम पदोन्नतीवर रूजु.

हिमायतनगर तालुका कृषि कार्यालयात मंडळ कृषि अधिकारी सिडाम पदोन्नतीवर रूजु.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 फेब्रुवारी 2026

किनवट तालुका उपविभाग कृषि विभागात कृषि पर्यवेक्षक म्हणुन कार्यरत असलेले सिडाम यांची हिमायतनगर तालुका कृषि कार्यालयात रिक्त असलेल्या मंडळ कृषि अधिकारी पदावर पदोन्नती झाली असुन ते सोमवारी मध्यानानंतर कार्यालयात रुजु झाले आहेत..सिडाम हे अतिशय अनुभवी, प्रशासनामध्ये काम करण्याची पध्दत चांगली असुन, कर्मचा-यांना हाताळण्याचे कसब त्यांच्यामध्ये आहे. येणा-या त्यांच्या कार्यकाळात हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांचे प्रलंबित प्रश्न नक्कीच ते सोडवतील अशी अपेक्षा आहे..हिमायतनगर कार्यालयात रुजु होताच त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी तालुका कृषि अधिकारी शिवाजी मिराशेसर, कृषि अधिकारी मारोतराव काळे, कृषि पर्यवेक्षक निलेश वानखेडे, सहायक अधिक्षक घोडगे, सहायक वरीष्ठ लीपीक अमोल भाऊ सुदेवाड, प्रा. सदानंद ढगे, कृषि सहायक माझळकर, माने, ढगे मॅडम, राहुलवाड, भुरके, गुहाडे, चाचानी , तोरकड, पत्रकार पतंगे व तालुक्यातील कृषि मित्र उपस्थीत होते…

Previous articleहोळकर राजघराण्याचे वंशज भूषण सिंह राजे होळकर करणार नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्याचा दौरा 
Next articleश्रीराम मंदिराबरोबरच नांदूर मधमेश्वर गावाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक विकासासाठी प्रयत्न करणार भूषण सिंह राजे होळकर