👉 सेवानिवृत्त सहायक अधिक्षक सुदेवाड यांचे प्रतिपादण..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 12 मार्च 2026
भारत देश हा कृषि प्रधान देश आपण नेहमी म्हणतो..ते खरंही आहे.परंतु कृषिप्रधान देशात शेतक-यांची अवस्थ आज रोजी एवढी बिकट आहे..ते शब्दात सांगणे खुपचं कठिण आहे..शेतीवरील बि..बियाणे, खते, औषधी , मजुराचा अभाव, उत्पादनात प्रचंड घट, शेतमालाचे पडलेले भाव, मशागतीचा खर्च, आर्थिक परिस्थीती या सर्व बाबींचा विचार केला तर शेती हि परवडत नाही. हे वास्तव सत्य आहे. परंतु शेतीव्यवसाय वडीलोपार्जित असल्याने तो करावाच लागतो…त्यासाठी कृषि विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन शिबीर, प्रशिक्षण, चर्चासत्र, प्रात्यक्षिक पाहणी या बाबीवर भर दिल्यास शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळेल असेही ते म्हणाले..
पाणी फाउंडेशन आयोजित यवतमाळ येथे हिमायतनगर येथुन शेतकरी प्रशिक्षणाला जात असतांना ते याप्रसंगी बोलत होते…




