मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 जानेवारी 2026
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. गावातील सवना ते रमणवाडी हा पांदण रस्ता पावसाळ्यात खराब झाला होतो…पाच ते सात किलोमिटर अतंरावरुन शेतातील माल घरी आणण्यासाठी नाहक त्रास होत होता…सर्व शेतक-यांनी मिळुन लोकसहभागातुन पांदण रस्त्याची दुरुस्ती केली आहे..शासनाने लवकरच हा रस्ता सामाजिक बांधकाम विभागा अंतर्गत हा पांदण रस्ताचे डांबरीकरण करण्यासाठी हदगांव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कोहळीकर यांची शेतक-यांचे शिष्ठमंडळ भेट असणार असल्याचे गंगा आलेवाड, संजय गायकवाड, शिवाजी अक्कलवाड, श्यामसुंदर आलेवाड, सुदर्शन गायकवाड, मारोती गायकवाड, सोनबा अहिरवाड, अमोल राऊत, सुधाकर फेदेवाड, प्रकाश अनगुलवार, अक्षय अहिरवाड आदी शेतकरी बांधवांनी सांगितले आहे.




