Home Breaking News देशातील हिंदुत्व हे सरकार हिंदू धर्म रक्षक अहिल्यादेवींच्या विचारांवर घाव का घालतय...

देशातील हिंदुत्व हे सरकार हिंदू धर्म रक्षक अहिल्यादेवींच्या विचारांवर घाव का घालतय …?

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070

रामभूमी नाशिक येथूनही उद्रेक…

श्री समाधान बागल (धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती नाशिक महाराष्ट्र राज्य)

प्रतिनिधी (नाशिक )पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आत्तापर्यंत कुठल्याही अभ्यासक्रमात शिकवला गेला नाही तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या बनवलेल्या वस्तूंवर ती कुठे स्वतःचं नाव लावून घेण्याचा किंवा कोरून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही परंतु केलेली काम ही एवढी महान आणि एवढी तेजस्वी आहेत त्या तीनशे वर्षानंतरही हा महाराष्ट्र बोलून उठेल एवढी काम अहिल्यादेवी होळकर यांची महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारत देशात बघायला मिळतात आणि म्हणूनच अहिल्यादेवी होळकर यांना मानणारा मोठा वर्ग अहिल्यादेवी होळकर यांना हिंदू धर्म रक्षक ही पदवी देतात पुण्यश्लोक ही उपमा देतात आणि अहिल्यादेवी होळकर ह्या ज्याही फोटोमध्ये दिसतील त्यामध्ये त्यांच्या हातामध्ये महादेवाची पिंड असणारा फोटो दिसतो परंतु अहिल्यादेवी होळकर यांनी 300 वर्षांपूर्वी पुढील हजारो वर्षांचे गणित लक्षात ठेवून बनवलेल्या वास्तू ह्या तोडून सध्याचे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारं सरकार हे अहिल्यादेवींचा विचार पुसण्यासाठी प्रयत्न करतय का…? हा प्रश्न आता अहिल्या प्रेमीं कडुन विचारला जात आहे कारण या अगोदर महाराष्ट्रामध्ये पंढरपूर कॉरिडॉर च्या नावाने हाक मारण्यात आली ज्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला घाट घाटाच्या पायऱ्या परिसर व श्रीराम मंदिर हनुमान मंदिर व अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगीचा पंढरपूर येथील होळकर वाडा या सर्वांवर टांगती तलवार शासनाने लावण्याचे ठरवले होते.

नाशिक पंचवटी अहिल्या घाट येथे विकासा च्या नावाखाली ब्राह्मण वेक्तीने हा घाट तोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच कुंभमेळ्याच्या धर्तीवर स्वतःचे अस्तित्व तयार होईल या उद्देशाने हा घाट तोडण्यात आला परंतु आंदोलन उभे राहले तेंव्हा कुठे स्थागित केले.आत्ताच मागच्या काळामध्ये नांदूर मधमेश्वर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगीचा वाडा पाडण्यात आला आणि विशेष म्हणजे हा वाडा पाडण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांचा कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नसताना तो वाडा पाडण्याचे दुष्कृत्य केलं गावकऱ्यांचाही तो वाडा खाजगी करण्यास विरोध आहे आत्तापर्यंत होळकर वाडा हा सार्वजनिक होता व सार्वजनिकच असावा अशी गावकऱ्यांची सुद्धा मागणी असताना अशा पद्धतीने होळकर वाडा अचानकपणे पाडण्यात आला आणि आता सत्तेचा कळस म्हणजे काशी येथील अहिल्यादेवी होळकर यांनी भारत वर्षातील सर्वात महान तीर्थांपैकी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असणारा काशी येथील माणिकर्णिका घाट हा भव्य दिव्य सुंदर असा घाट अचानकपणे चार तासात जेसीबी लावून तोडून टाकण्यात आला आणि विशेष म्हणजे या घाटावरती कुठल्याही प्रकारे देवी देवतांच्या मूर्तींची योग्य काळजी घेतली गेली नाही किंवा त्यांचा सन्मान राखण्यात आला नाही किंबहुना मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीवरही त्या ठिकाणी बुलडोजर चालवण्यात आलं ही गोष्ट अखंड हिंदुस्थानातील हिंदू समाजाच्या हृदयाला लागलेली आहे आणि अशा परिस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांचा विचार पुसण्यासाठी हे हिंदुत्ववादी सरकार काम करतय का..? असा स्पष्ट सवाल अहिल्या प्रेमींकडून विचारला जात आहे

आणि याच पार्श्वभूमीवर आत्ताच नाशिकमध्ये होत असणारा महा कुंभमेळा आणि त्या ठिकाणी होणार असणारी विकास काम या सर्वांची पार्श्वभूमी लक्षात घेता आता नाशिकमध्ये पहिल्याप्रमाणे भीती वाटत आहे की अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाबरोबरच अहिल्यादेवींनी तयार केलेले धार्मिक तीर्थक्षेत्र स्थळ यांचं परत जेसीबी लावून तोडकाम तर केल जाणार नाही ना..? याचबरोबर हिंदुत्वाचा सण म्हणजे कुंभमेळा अहिल्यादेवी होळकर यांनी प्रत्येक कुंभमेळ्याच्या जागी तत्कालीन परिस्थितीला साजेशी सुंदर रचना करून साधुसंतांना कुंभमेळा साजरा करण्यासाठी योग्य सोयी सुविधा करून दिल्या अन्नछत्र उभी केली बारव बांधली तलाव बांधले तसेच कुशावर् तासारखं महत्त्वाचे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांनी बांधून दिले आणि त्यामुळे हिंदू धर्माचे हे उत्सव अविरतपणे साजरे होत राहिले व त्या जागी हे सन साजरे होण्यासाठी कुठली अडचण आली नाही परंतु सध्याचे सरकार हे कुठल्याही धार्मिक रितीपरंपरा धार्मिक मूर्ती देवी देवतांच्या मूर्ती अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्ती यांचा मानसन्मान राखत नाही असे दिसून येत आहे

अहिल्यादेवी होळकर यांच्या वास्तू तोडताना अगदी राजघराण्यातील वंशजांनाही विचारात घेतलं जात नाही ही बाब खूप खेदाची आहे त्याचबरोबर अविरतपणे आणि कुठलाही दूरदृष्टीकोन न ठेवता केला जाणारा हा नासका विकास आम्हाला नकोय त्या ऐवजी लोकांची मते विचारात घेऊन समाजाच्या भावना लक्षात घेऊन अहिल्यादेवी होळकरांचे विचार हे अविरतपणे पुढे चालू राहतील अशा पद्धतीने होणारा विकास आम्हाला मान्य आहे असे मत नाशिक येथील होळकर प्रेमींनी मांडले आहे

जर विकासच करायचा असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखा विचार असावा हिंदुत्वाच्या पाऊलखुणा नष्ट करून स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणारे जर स्वतःला विकासशील म्हणत असतील तर आम्ही त्यांना नासके विकासक म्हणू यामध्ये आम्हाला कुठलाही खेद वाटणार नाही अशी स्पष्ट भूमिका नागरिकांच्या वतीने मांडण्यात येत आहे

नाशिक कुंभमेळ्याच्या ठिकाणी होत असणारा विकास काम हे जर योग्य प्रकारे नाशिक शहराला साजेशी नाशिककरांना साजेशी नाशिकच्या ऐतिहासिक सांस्कृतिक धरोहर जपणारी अशा पद्धतीचे नसेल तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी दिलेला आहे त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षानेही त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे

  1. आणि याच परिस्थितीमध्ये या भूतो न भविष्यती अशा आंदोलनाला शासनाला सामोरे जावे लागते की काय अशी भीती आता येणाऱ्या काळात उभी राहिलेली आहे

प्रतिक्रिया =

स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतल्याने कोणतही सरकार हिंदुत्ववादी होत नाही तर ते त्यांच्या कर्मातून किंवा कामातून दिसायला हवे कारण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणार सरकार हे हिंदूंच्या धार्मिक अस्मितांचा नाश करताना दिसत आहे आणि भाषणांमधून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेत आहे तर ही गोष्ट कुठल्याही प्रकारे योग्य नाही, अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्ती राम मंदिर व काशी विश्वनाथ मंदिरा बाहेर बसवल्या त्यासाठी आम्ही शासनाचे आभारी आहोत व त्यासाठी आम्ही मोदीजींना धन्यवाद देऊ परंतु अहिल्यादेवींच्या वास्तु व पाऊलखुणा जर तुम्ही तळागाळातून नष्ट करण्याचा प्रयत्न करत असाल तर तेवढ्याच प्रखरपणे आम्ही विरोधी करू हे विसरता कामा नये असे स्पष्ट मत समाधान बागल यांनी मांडले

Previous articleफुकट वाटप योजना आणि त्याचे दुष्परिणाम 
Next articleलोकसहभागातुन पांदण रस्त्यांची शेतक-यांनी केली दुरुस्ती..