Home Breaking News हिमायतनगर शहराच्या स्वच्छतेसाठी स्वत: नगराध्यक्ष प्रत्यक्षदर्शनी रस्त्यावर… 

हिमायतनगर शहराच्या स्वच्छतेसाठी स्वत: नगराध्यक्ष प्रत्यक्षदर्शनी रस्त्यावर… 

👉 जनतेकडुन कौतुक

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 31 जानेवारी 2026.      शहरातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफीक यांनी प्रथम शहरातील स्वच्छतेला महत्व देत मुख्य रस्त्यावरील बसस्थानक, बाजारपेठ, गल्ली बोळातील शहरातील प्रत्येक भागातील केरकचरा स्वता उभा राहुन स्वच्छता कर्मचारी यांच्याकडुन साफ करतांना दिसुन आले..शहरातील नागरीकांना घाणीचा त्रास होऊ नये, यासाठी स्वच्छ, सुंदर शहर दिसावं यासाठी नगराध्यक्ष पदांची सुत्रे हाती घेताच प्रत्यक्षदर्शनी शेख रफीक शेठ कामाला लागले आहेत..प्रशासन काळात शहराचा व्हावा तसा विकास झाला नाही..शहरातील नळाला दररोज पाणी येत असुन सध्यातरी नागरीक समाधानी आहेत..स्वच्छतेचे महत्व नागरीकांना कळावे..शहर स्वच्छ झाल्यास आरोग्य सुध्दा चांगले राहते…या उदात्त भावनेने नगरपंचायतीने स्वच्छतेचे काम हाती घेतल्यानंतर नागरीक समाधानी आहेत..

Previous articleलोकसहभागातुन पांदण रस्त्यांची शेतक-यांनी केली दुरुस्ती..
Next articleबाळापूर ते वाडेगांव रोडवरती बिबट्या मृत अवस्थेत आढळला