विजाच्या कडकड्यासह मुसळधार पावसात,दुधड येथे वीज पडून बैलाचा मृत्यू .

0

हिमायतनगर |कृष्णा राठोड तालुक्यातील मौ. दूधड येथे आज दिं 11 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पांडुरंग आंनदराव सूर्यवंशी यांच्या शेतात गोठ्यात बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने एक बैल दगावल्याची घटना घडली आहे.. दूधड सोनारी परिसरात अचानक 11 जून शनिवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान वादळी वारे विजाच्या कडकडाटासह पाऊसाला सुरुवात झाल्याने दूधड येथील शेतकरी पांडुरंग आनंदराव सूर्यवंशी गट क्र. 275 यांच्या...

मनरेगा सिंचन विहीरींची देयके रखडली, शेतकरी हैराण!

0

सबंधित कर्मचारी अन् रोजगार सेवकांची अनास्था शेतक-यांच्या मुळावर परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ईच्छूक गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बागायती पिके घेण्यासाठी कायम पाण्याची सोय व्हावी म्हणून शासन नवीन सिंचन विहीर मंजूर करीत असते. याकरिता खोदकाम आणि बांधकाम करण्यासाठी मजूरांच्या नावे कामा प्रमाणे टप्याटप्याने एकूण ३ लाख रुपये निधी देण्यात येतो. याच प्रमाणे पूर्णा...

नांदेड जिल्हा परिषदेचा वरीष्ठ कृषि अधिकारी.. हिमायतनगर तालुक्याचा काॅलीटी कंट्रोलर कसा?

0

👉विशेष खरीप हंगाम 2022 👉 फक्त खरीप हंगामात येतो नमुने काढायला.... मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर दिनांक - 10 जुन 2022 "भारत हा कृषिप्रधान देश आहे." हि मन सर्वस्तृत सर्वत्र परीचित असली तरी, ज्यांनी हिमायतनगर पंचायत समिती तेथे कृषि अधिकारी म्हणून सतत तिन ते सहा वर्ष सेवा केली. त्यांची पदोन्नती नांदेड जिल्हा परिषद येथे वरीष्ठ कृषि अधिकारी म्हणून बढती झाली...असली तरी, आपला कायम दबदबा...

शेतक-यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार!

0

..दत्तराव काळबांडे .बालाजी काळबांडे.ओमकार काळबांडे सामाजिक कार्यकर्ते अगंदराव काळबांडे यांचे मनोगत ---------------- परभणी, (आनंद ढोणे पाटील) - शेतकरी हा संपूर्ण जगाचा अन्नदाता आहे. तो उन्हा तान्हात थंडी पावसात, रात्रंदिवस एक करुन काबाडकष्ट करतो.शेतकरी टिकला तरच देश अन् जग टिकेल, आज शेतकऱ्यांच्या समस्येवर फुंकार घालण्यासाठी कुणाकडे वेळ उरला नाही. तरीही आमच्या सारखे तरुण शेतकऱ्यांची मुले शेतक-याच्या पदरात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आर्थिक बळ देण्याचे...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचित!

0

परभणी, (आनंद ढोणे पाटील) - भाजपप्रणीत मोदी सरकारने १ फेब्रुवारी २०१९ पासून भारतातील सर्व शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी काही अंशी मदत व्हावी म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालू केली. या योजनेत नोंद करुन सहभागी झालेल्या पात्र शेतकऱ्यांना भारत सरकार कृषी मंत्रालयाच्या वतीने प्रति हप्ता २००० हजार रुपये या प्रमाणे वर्ष भरात एकूण ६०००/ हजार रुपये थेट बॅंक...

खरीप हंगामात हिमायतनगरची बाजारपेठ फुलली !

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 जुन 2022 👉 फेरफटका " काठीनं.. घोंगडं..घेऊ.. द्या की रं.... मला.. बि.. बाजाराला ( जत्रला) येऊ द्या कि..रं." अशी जुनी गाणी अनेकांनी ऐकली असेल..पण सध्या खरीप हंगाम 2022 साठी विविध शेतीविषयक लागणा-या साहित्याची खरेदी करण्यासाठी आमचा बळीराजा... खते, बि.. बियाणे, औषधी, प्लास्टिक कापड, टिनपत्रे, सिमेंट पोल, लाकडी बली, रेगाटी, वखर, कोळपे, बैलाची दोर आदी..... साहित्य...

पूर्णा-पांगरा रस्त्यावरील ३ किमी मेंटेनन्स रस्ता दूरस्तीचे काम केल्यानंतर उर्वरित साईड बर्मचे काम न करता गुत्तेदाराचा पोबारा

0

परभणी, (आनंद ढोणे पाटील) - पूर्णा तालूक्यातील पांगरा-पूर्णा या एकूण ६ किमी अंतर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडून रस्ता अक्षरश:चाळणी झाला होता. या रस्त्याचे नव्याने मजबुतीकरण करुन हाॅटमिक्स पध्दतीने काम करण्याची मागणी पांगरा, पिंपळा लोखंडे, वाई, लोण, मरसूळ येथील गावक-यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. याकरिता गंगाखेड विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे, खासदार संजय जाधव आणि राज्याचे...

शेतकरी करत आहेत धूळपेरणी ला सुरुवात,…

0

👉🏻मृग नक्षत्र लागून सुद्धा पावसाचा बेपत्ता.. पेरणीसाठी बळीराजा झाला सज्ज हिमायतनगर प्रतिनिधी कृष्णा राठोड /- दर वर्षीपेक्षा या वर्षी मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील टेंभी, अंदेगाव ,जवळगाव, पोटा, मंगरूळ, धानोरा, बोरगडी ,सिरंजनी, डोलारी, पळसपुर, घारापुर, खडकी, सह आदी गावातील शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजाला दाद देत भरउन्हात अंगावर ऊन काढत खरिपाची पेरणी ,पूर्व मशागत करण्यास...

रोजगार हमी योजना कक्षातील गैरहजर अधिका-याच्या खुर्चीला हार अर्पण करुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिका-यांनी केला सत्कार

0

पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील प्रकार! रोजगार हमी योजनेअंतर्गत बिले काढण्याच्या कामात फोफावला भ्रष्टाचार परभणी, (आनंद ढोणे पाटील) -जिल्ह्याच्या पूर्णा तालुका पंचायत समिती कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षातील सबंधित अधिकारी व अकाऊंट कक्षातील अधिकारी हे दि ८ जून २०२२ रोजी नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे तालूका प्रमुख शिवहार सोनटक्के, युवा तालूका प्रमुख नरेश जोगदंड, शहर प्रमुख संजय वाघमारे,उप ,...

थकीत पिक कर्ज नूतनीकरण केल्यास लगेच दुसरे कर्ज मिळणार

0

राजेश जोशी (मुख्य प्रबंधक बॅंक ऑफ महाराष्ट्र लातूर) यांचे प्रतिपादन! ------------ परभणी, (आनंद ढोणे पाटील)- पूर्णा तालूक्यातील जी गावे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेशी दत्तक आहेत अशा गावातील शेतक-यांनी आपल्याकडील थकीत पिक कर्ज रक्कम भरणा करुन कर्ज खाते नुतनीकरण करावे आणि लगेच दुसऱ्या दिवशी दहा टक्के वाढीव रक्कमेत नवीन पिक कर्ज घ्यावे असे प्रतिपादन पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथील शेतकरी खातेदाराशी संवाद...