मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 31 जुलै 2025
हिमायतनगर तालुक्यातील राजा भगिरथ उच्च माध्यमिक विद्यालयाचे मराठीचे प्रा. गोंविंदराव माने सर शासकीय वयोमानानुसार शासकीय सेवेतुन आज रोजी सेवानिवृत झाले आहेत. मराठी भाषेवर माने सराचं विशेष प्रभुत्व होते. विद्याथर्याना सहज आणी सोप्या भाषेत ते अध्यापन करीत असत.
त्याचबरोबर नगरपंचायत हिमायतनगर येथील वरिष्ठ लिपीक हिमायतनगर येथील भुमिपुत्र मारोती हेंद्रे हेही आज वयोमानानुसार शासकीय सेवेत उन सेवानिवृत्त झाले आहेत. हेंद्रे साहेब हे अतिशय प्रेमळ आणी शांत स्वभावाचे असुन प्रशासकीय काम करण्याची हातोटी अतिशय छान होती.
तसेच पवना जिल्हा परिषद शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक, लेखक, कवि म्हणुन विद्यार्थीप्रिय शिक्षक मारोती वाघमारे सरांची हिमायतनगर तालुक्यात ख्याती आहे. अतिशय शांत स्वभावाने विद्यार्थयांना ज्ञानार्जन करीत असत..
हदगांव- हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम आणी माजी आमदार माधवराव कदम यांनीही त्यांना मनपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा.गोंविदराव माने सर, वाघमारे सर, हेंद्रे साहेब या तिन्हीही मान्यवरांना आपल्या पुढील वाटचालीसाठी साप्ताहिक भुमी राजा न्युजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
धो.




