Home Breaking News वडगाव येथील रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅक चे काम ठेकेदारा कडून पुन्हा...

वडगाव येथील रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅक चे काम ठेकेदारा कडून पुन्हा करून न घेतल्यास

लखन इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा

भुमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे

अकोट:- अकोला जिल्ह्य़ातील व अकोट तालुक्यातील वडगाव येथे रस्त्याचे बोगस झालेल्या पेव्हर ब्लॉक चे काम ठेकेदाराकडून पुन्हा करून न घेतल्यास लखन इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा. गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले . लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात मागणी अशी आहे. कि राहुल नगर लगत वडगाव रोड चे काम आमदार निधी अंतर्गत झालेले आहे.या डांबरीकरणाला लागून पेव्हर ब्लॅक चे काम हे निकृष्ट दरज्याचे झालेले आहे . दबाई न करता पेव्हर बसविले म्हणुन येथील पेव्हर ब्लॅक उखडल्या गेले व काही नाल्यात वाहून गेले आहेत. या करीता हे काम पुन्हा ठेकेदार यांच्या कडून करून घेण्यात यावे . नाहीतर आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे यांनी निवेदनात दिला आहे. या वेळी संबंधित अधिकारी यांना देताना उपस्थित म्हणून नितीन तेलगोटे ,अमोल तेलगोटे ,अक्षय तेलगोटे, राजु भोंडे संदिप पोटे ,रामेश्वर दाभाडे ,प्रतीक तेलगोटे ,योगेश दवंडे ,नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे ,अंकुश इंगळे नितेश दामोदर ,सुमेध तेलगोटे ,रोहन दामले मंगेश तेलगोटे, निलेश शिंगाडे ,अक्षय रंदे सागर, अस्वार मंगेश ,दवंडे विशाल पडघामोल, अजय सावंग, गणेश खंडारे ,आशिष इंगळे ,ऋषीं शिंगाडे ,आकाश इंजडीकर ,सुधाकर केदार शरद ,सु.तेलगोटे ,रामअनुज राऊत उपस्थित होते.

Previous articleपक्या रस्त्यासहित स्मशानभूमीत शेडसाठी निधी उपलब्ध करून द्या..
Next articleसर्वधर्म समभाव एकता प्रतीक चे उदघाटन सुरेश कूमार घुसर य़ांच्या हस्ते पार पडला.