भाव दर कमी;उत्पादन खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक अडचणीत.
योगेश घायवट वाडेगाव:- बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते.परंतु या वर्षी शासनाकडून कांदा भाव कमी असल्याने शेतकरी अडचणी मध्ये सापडला आहे. रब्बी हंगामातील कांदा पीक परीसरात सध्याच्या परिस्थितीत अंतिम टप्प्यात असून जास्त तापमान मुळे उत्पादनात घट निर्माण होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच उत्पादन खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गत पावसाळ्यात अधिक...
सिंधुदुर्ग मध्ये मोठी दुर्घटना, अकोल्यातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
अकोला- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास पर्यटकांनी भरलेली बोट पलटी झाल्यामुळे त्यामध्ये अकोल्यातील युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे, यामध्ये अकोल्यातील आकाश देशमुख नामक युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सदर युवक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांचा भाचा असल्याचे कळते. आकाश देशमुख कुटुंबात एकुलता एक मुलगा असल्याचे कळते. प्राप्त माहिती अनुसार अकोल्यातील काही युवक गोवा सहलीसाठी गेले होते,...
नविन पिक कर्जाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
👉 भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी स्वप्नील आखाडे यांचे आव्हान मारोती अक्कलवाड सवनेरकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 24 मे 2022 हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी नवीन पिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी 31 मे 2022 प्रयंत खालील कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी स्वप्नील आखाडे साहेब यांनी केले आहे. नविन पिककर्ज घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी नविन पिक कर्ज ज्या शेतकऱ्यांना घेयायचे आहे....
हिमायतनगर तालुक्यात 10:26:,26 खतांचा तुटवडा….
मारोती अक्कलवाड पाटील जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 24 मे 2022 " जगाचा पोशिंदा शेतकरी"म हि भावनीक उपमा कुणाच्याही सहज मनात दुःख देऊन जाते... पण हिमायतनगर तालुक्यातील बळीराजाचे शेतीविषयक चित्र काहीसे वेगळेच आहे... खरीप हंगामात 2022 या वर्षात भोळा शेतकरी राजा कापुस, हळद, सोयाबीन, ज्वारी, मुग, उडीद या विविध पिकांची पेरणी करतो. पण हिमायतनगर शहरातील कृषि सेवा केंद्र चालकांनी एक नामी आणि चमत्कारिक शक्कल लढवली आहे.....
महाकावी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व निमंत्रितांचे कविसंमेलन
औरंगाबाद प्रतिनिधी दि 21 मे 2022 रोजी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी -नाशिक आयोजित महसूल प्रबोधिनी हॉल, औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. नंदकिशोर घोडेले ( मा.महापौर औरंगाबाद), कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ आनंद रत्नाकर आहिरे व स्वागताध्यक्ष प्रा. डॉ संघर्ष सावळे( अर्थशास्त्र विभाग-डॉ. बा. आं. म. विद्यापीठ) कवी संमेलनाचे अध्यक्ष -मा.हबीब भंडारे (कविसंमेलनाध्यक्ष) तसेच मा. रुपाली पवार...
नाशिक मधील प्रसिद्ध अहिल्याराम मंदिराच्या चरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाची निमंत्रण पत्रिका अर्पण
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा 22 मे रविवार रोजी नाशिक येथील पंचवटी मधील रामकुंडा जवळील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या अहिल्याराम मंदिरातील श्रीरामप्रभुना व मंदिरात असलेल्या अहिल्यादेवी च्या मुर्तीला 31मे रोजी होणाऱ्या अहिल्या जन्मोत्सवाची पत्रिका अर्पण करण्यात येऊन पुजा करुन जन्मोत्सव यशस्वी होण्यासाठी आशिर्वाद घेण्यात आले. या प्रसंगी अहिल्याराम मंदिराचे पुजारी वैभव क्षमकल्याणी यांनी अहिल्याराम मंदिराचा व त्याच बरोबर...
गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे दोन लाखांवर नुकसान
शेतकरी:- दामोदर वासुदेव गावंडे यांचा टाहो; गोरेगाव बु येथिल घटना प्रतिनिधी:-योगेश घायवट वाडेगाव. येथुन जवळच असलेल्या गोरेगाव बु येथे गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखांवर नुकसान झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव बु येथिल शेतकरी दामोदर वासुदेव गावंडे यांचा गुराढोरांचा गावातच असलेल्या गोठ्याला दिनांक विस मे रोजी च्या रात्री दिड वाजताच्या सुमारास गोठ्याला आग लागली तर गोठ्या समोरच...
पाण्याची बकेट गळ्यात अडकून हरणाचा मृत्यू..
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला शिवारातील विहीरीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाने बकेट मधील पाणी पिण्याच्या नादात गळ्यात बकेट अडकल्यामुळे हरणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भागात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. उन्हाची तिव्रता वाढत असल्याने हरीण, निळ,वानर,रोही यासारखे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी रानोमाळ भटकंती करीत आहेत. कारला शिवारात रविवारी शेतकरी काशिनाथ सोनबा रासमवाड यांच्या शेतात पाणी...
नाथ समाजाचे भव्य मेळावा आयोजन….
राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या हस्ते होणार उद्घाटन.... (प्रतिनिधी)-नाथ समाज कार्यात अग्रस्थानी असलेल्या वैदर्भीय नाथ समाज संघ या नाथ समाजा साठी कार्य करणाऱ्या संस्था वजा संघटनेच्यावतीने दि.२९/०५/२०२२ रविवार ला कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील बाबासाहेब धाबेकर सभागृह मुर्तीजापूर रोड कारंजा लाड येथे भव्य नाथ समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याचे विशेष म्हणजे सदर मेळावा हा समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच भव्य अशा स्वरूपात...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा निमित्त नाशिक मध्ये थेट जनसंपर्क अभियान
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा 31 मे रोजी अहिल्यादेवी होळ कर यांच्या जयंती निमित्त नाशिक मध्ये जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या करीता युवा नेते समाधान बागल व जेष्ठ नेते मा. खंडेराव पाटील यांच्या नेतृत्वात पंचवटी, सातपुर, सिडको, नाशिकरोड या विभागात थेट जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानातर्गत शिवाजी गार्डन सीबीएस येथे होणारे अभिवादन व महाप्रसाद, शिवाजी...
