पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा बैठक संपन्न
हेमंत शिंदे - नासिक जिल्हा संपादक भूमीराजा 31 मे या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी साजऱ्या होणाऱ्या सोहळ्याची बैठक सकल धनगर समाज नाशिक जिल्हा यांच्या वतीने शनिवार दि.30 एप्रिल रोजी नाशिक मधील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील हुतात्मा स्मारका मध्ये घेण्यात आली. या बैठकी मध्ये नाशिक मधील मध्यवर्ती सीबीएस बसस्थानका समोरील शिवाज़ी उद्यान मधील अहिल्यादेवी चा पुतळा ते अहिल्या पटांगण गोदाघाट या...
गोर सेनेचा क्रांतिकारी मोर्चा मुंबईत धडकणार ……
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जगदीश जाधव यांचे आवाहन..... हिमायतनगर ( नांदेड) कृष्णा राठोड भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे झाली तरीही या देशाचे मूलनिवासी असूनही अद्याप आम्हाला आमचा हिस्सा , मानसन्मान , हक्क , अधिकार बरोबर देण्यात आलेला नाही . यासह असंख्य मागण्यांसह गोर सेनेच्या वतीने ११ मे बुधवार रोजी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथील...
दलित युवक मनेशआव्हाडच्यां मारेकऱ्यांना तात्काळ फाशीवर लटकवा..
लोकस्वराज्य आंदोलनाची मागणी... हिमायतनगर प्रतिनिधी ( कृष्णा राठोड )औरंगाबाद शहरातील सिडको येथे एका दलित मागासवर्गीय मातंग समाजात राहणारा कै. मनेश शेषेराव आव्हाड वय २७ वर्षे हा युवक महानगरपालिकेच्या सभाग्रहाची व्यवस्था पाहण्यासाठी महिन्यांने राहत होता.या ठिकाणी बरेच दिवसांपासून महिन्याने काम इमानदारीपूर्वक करत असताना,येथील माजी नगरसेविका खरात यांच्या कुटुंबातील मंडळीकडे या सभाग्रहाची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी होती.परंतु या ठिकाणी इमानदारीपूर्वक चोवीस तास काम...
योजना घेऊन आम्ही गावात आलो; सहभागी होऊन आपल्या गावाचा विकास करा…..
दशवार्षी नियोजन आराखाडा बैठकीत -- गटविकास अधिकारी मुखेड यांचे मत . नामदेवराव बोमनवाड तालुका प्रतिनिधी मुखेड नांदेड जिल्हा वर्ताला या गावाचा एम जी नरेगा अंतर्गत दशवार्षीक नियोजनासाठी मुखेड तालुक्यातून एकाच गावाची निवड करन्यात आली या आराखाडा ग्रामस्थाची बैठकीत प्रत्येक कुटूंबासाच्या विकासासठी कोणती योजना आवशक आहे हे आपणच सर्व्हेफार्म मध्ये लिहुन द्याव योजनांची माहीती त्या फार्ममध्ये दिली आमची माणस आपल्या घरी येतील...
सामुहिक विवाह मेळावे घेणे हि काळाची गरज….
👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचे प्रतिपादन मारोती अक्कलवाड सवनेकर दिनांक- 26 एप्रिल 2022 हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना येथील 25 एप्रिल रोजी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात अंदाजे दोन ते अडीच हजार पाहुण्यांची उपस्थित होती. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने, सर्वांच्या सहकार्याने या मेळाव्यात सर्व ग्रामस्थांनी काम केले आहे. 👉 वधुवरांना शुभेच्छा संदेशात आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर म्हणाले आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेळ फार आहे....
अपघातग्रस्त स्व.गौतम राऊत यास आर्थिक मदत…
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक-26 एप्रिल 2022 आज हिमायतनगर तालुक्यातील सवना (ज) येथे सार्वजनिक विवाह मेळाव्या मध्ये भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख विशाल अनगुलवार यांच्या विवाह प्रसंगी भारतीय जनता पार्टी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी ह्या विवाह सोहळ्यास भेट दिली. काल हिमायतनगर रेल्वे स्टेशन येथे सवना(ज) येथील शेतमजूर गौतम गणपत राऊत हे नांदेड जाण्यासाठी चढत असताना, अचानक रेल्वे चालु...
रमणवाडी तांडा येथे तिव्र पाणी टंचाई. 👉 नागरीकांना शेतावरुन आणावे लागते पाणी..
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक-26 एप्रिल 2022 हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी- रमणवाडी तांडा येथे गट ग्रामपंचायत असलेल्या मुळे , रमणवाडी तांडा येथील नागरिकांना तळपत्या उन्हात पिण्यासाठी पाणी आणावे लागते. हि वस्तुस्थिती आहे. गावातील बोअरवेल बंद असुन, गावाजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरी वरील मोटार चालू केल्या केल्या, तिथे नागरीकांची प्रचंड गर्दी दिसून येते. रमणवाडी तांडा येथील सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले असुन ग्रामपंचायत कार्यालय...
इंटरसिटी रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन झाला युवकांचा मृत्यू; सर्वत्र हळहळ
स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि उभ्या रेल्वेत राहणारे अंतर कमी करून अपघात टाळण्याची मागणी.. अंगद सुरोशे हिमायतनगर-रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका युवकांचा हात घसरून रेल्वेखाली आल्याने दोन तुकडे होऊन जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे रेल्वे विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाने हिमायतनगर येथील स्थानकावरील प्लॅटफॉर्म आणि...
सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 24 एप्रिल 2022 उन्हाळ्याचे दिवस अन् वधुवराची लगीन घाई! सध्या ग्रामीण असो व शहरी भागातील लोकांची धावपळ पाहता लग्नसराईचे दिवस आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या प्रार्दुभावामुळे सामुहिक विवाह मेळावे होऊ शकले नाही. मौजे सवना ज. येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन समस्त सवना ग्रामस्थांनी आयोजित केला आहे. या...
आ. जवळगावकरांमुळे कारला गावातील रस्त्यांचा प्रश्न सुटला… डॉ गफार
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/ आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नाने गावातील मुख्य रस्त्याचे काम व कारला फाटा ते गावापर्यंत डांबरीकरण रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले असून ग्रामस्थांची रस्त्याच्या कामाची गेल्या अनेक वर्षांपासून ची मागणी पुर्ण झाली असल्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार यांनी व्यक्त केले आहे. हिमायतनगर तालुक्यातील कारला ते गावापर्यंत च्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली होती. खड्डेमय रस्ता झाल्यामुळे नागरिक...
