माजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काॅग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 ऑगस्ट 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर नगरीचे माजी सरपंच, चेअरमन, हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक डॉ. प्रकाश वानखेडेमामा यांची काॅग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र जिल्हा अध्यक्ष बि. आर. कदम यांनी एक ऑगस्ट रोजी विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते वितरीत केले आहे. डॉ. प्रकाश वानखेडे...
सततधार,अति पावसामुळे देगाव येथे घर कोसळले !
अकोला जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854 वाडेगाव -येथून जवळच असलेल्या ग्राम देगांव येथे अति पावसामुळे घर कोसळून एका गरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला असून शासकीय मदतीला कोणी धावून येईल का ? अशी अपेक्षा हे गरीब कुटुंब करत आहे. सविस्तर वृत्त असे की, देगांव येथे राहत असलेले याकूब खा हे अत्यंत गरीब असून शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. सततधार पाऊस...
ओबीसींनो हित अहित जाणा…!!
* ओबीसींनो हित अहित जाणा...!! ---------------------------------- तुम्ही शुद्र होतात. मग ओबीसी कसे झालात...?? इतिहास असे सांगतो की,छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ते शुद्र असल्याने ब्राम्हणांनी नाकारला होता. तुकाराम महाराज शुद्र असल्याने त्यांना ज्ञान देण्याचा अधिकार नव्हता म्हणून त्यांच्या गाथा धर्म पंडीतांनी इंद्रायणीत बुडविल्या होत्या...!! ही दोन ठळक उदाहरणे हेच सांगतात की, वर्ण व्यवस्थेत शुद्र हा अतिशय हीन पातळीवर होता....!! त्याला राजा होता येतं नव्हते तसेच...
वाडेगाव येथील ग्रामपंचायत कारभारामधे ; सरपंच “पती” यांची ढवळाढवळ !
अखेर वाडेगाव नागरिक यांचे सह्या असलेल्या तक्रारीमधे,आशय सरपंच पती यांच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हावी जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो ,8888872854 बाळापुर तालुका वाडेगाव येथील ग्रामपंचायत कारभारमध्ये सरपंच पती ढवळाढवळ करीत असल्याबाबत तक्रार सादर करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती बाळापुर यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये वाडेगांव येथील ग्रामपंचायत च्या सरपंच रूपाली अंकुश शहाणे यांचे पती...
सवना ज. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची प्रगतीकडे वाटचाल!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-23 जुलै 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. हे निजामकालीन चळवळीत गांव म्हणुन तशी संबंध मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्र ओळख आहे. कारण येथील कै. स्वातंत्र्य सैनिक गणपतराव पिटलेवाड , तत्कालीन उच्चशिक्षित कै. संभाजी पाटील, पोस्टमास्तर कै. परशराम अनगुलवार , कै.माजी सरपंच बाबाराव भुसाळे कै. माजी सरपंच लक्ष्मण अनगुलवार या दिग्गज मंडळीनी सवना ज. भुमीचे...
पळसपुर – डोल्हारी अंतर्गत येणारा रस्ताच्या कामाला गुत्तेदाराचा मनमानी कारभार….
चार वर्षापासून काम सुरू असलेल्या पळसपुर -डोलारी या अंतर्गत रस्त्याची चौकशी करून गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका - नागोराव शिंदे पळसपुरकर अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर हिमायतनगर - तालुक्यातून जाणारा पळसपूर डोल्हारी सिरपल्ली मार्गे जाणारा महामार्ग हा अनेक कारणामुळे वादाच्या भौऱ्यात अडकलेला पाहावयास मिळत आहे. गुत्तेदार चार वर्षापासून या कामास सुरुवात करुन काम पूर्ण करण्याचे टाळत असून कामही अगदी निकृष्ट दर्जाचे होत आहे....
वाडेगाव येथील गजानन वाडी नागरिकांनी नागरी सुविधा मिळणे साठी पंचायत समिती सदस्य यांना निवेदन केले सादर
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट बाळापुर तालुका येथील वाडेगाव वार्ड क्रमांक १ मधील गजानन वाडी मध्ये नागरिकांना सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी गजानन वाडी मधील रहिवाशी संतप्त नागरिक अखेर ग्रामविकास अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली आहे. ग्रामपंचायत चे सर्व कर नियमित भरणा करीत असतांना गजानन वाडी हे वस्ती 40 ते 50 वर्षापासून वाडेगाव एक भाग म्हणून विकसीत झाला असुन तरीसुध्दा ग्रामपंचायत प्रशासन...
अनिल लक्ष्मणराव माने करंजीकर यांना पी. एच.डी . प्रधान…..
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी करंजी नगरीचे भूमिपुत्र श्री अनिल लक्ष्मण माने यांना तमिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयातून पी.एच.डी. हिंदी पदवी प्रदान करण्यात आली. अत्यंत कठीण परिश्रमाने, आपल्या जिद्दीच्या जोरावर प्राध्यापक डॉक्टर अनिल लक्ष्मण माने यांनी हा बहुमान मिळवीला आहे. त्यांचा पी.एच.डी. चा शोध विषय - "आधुनिक हिंदी कविता और मानव मूल्य" (इक्कीसवीं सदी के प्रथम दशक के विशेष संदर्भ में) हा होता....
वाडेगाव येथील स्थानिक गजानन वाडी नागरिकांचे स्वास्थ धोक्यात
वाडेगांव येथील सरपंच व ग्रामसेवकांचे गजानन वाडी यांच्याकडे दुर्लक्ष प्रतिनीधी -बाळापूर तालुक्यातील वाडेगांव असलेलं गावातील गजानन वाडी रस्ता असलेल्या परिसराकडे गावात जाणारा रस्ता हा पहिल्याच पावसाच्या पाण्यात तुडुंब भरल्याने येथे घाण पसरून नागरिकांचे स्वास्थ धोक्यात आले आहे.चिखल आणि घाणीच्या सम्राज्याचा गावातील महिलांना व गावातील गजानन वाडी नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सविस्तर वृत्त असे की गजानन वाडी...
कार्ला -पिचोंडी गाव घाणीच्या विळख्यात
कार्ला येथील सरपंच ग्रामसेवकांचे गावाकडे दुर्लक्ष अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी - तालुक्यातील मौजे कारला गावातील मुख्य रस्ता असलेल्या मंदिर व बौध्द विहार परिसराकडे गावात जाणारा रस्ता हा पहिल्याच पावसाच्या पाण्यात तुडुंब भरल्याने तसेच चिखलाचा आणि घाणीच्या सम्राज्याचा गावातील महिलांना व गावातील नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सविस्तर वृत्त असे की गावातील रहदारीचा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात रस्त्याने पाणीच...










