आण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार – *संतोष आंबेकर*
भूमिराजा न्युज शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड -9145043381 हिमायतनगर/- लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा केंद्रबिंदु हा शोषण, अन्याय, अत्याचार विरहित समाज हाच राहिला आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती, त्यांच्या कथा-कादंबरी मधील नायक, नायिका जनतेला शोषणाच्या विरोधात लढा उभारण्याचं सामर्थ्य प्रदान करणारे आहेत. आणि...
🌹*माझी शाळा*🌹
आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!! त्यावर करतो तांब्यानी प्रेस, तयार आमचा शाळेचा ड्रेस!! खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!! धोतराचं फडकं आमचं टिफीन, खिशात ठेवुन करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ? मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार, हाच आमचा पोषण आहार!! रानातला रानमेवा भारी मौज, अनवाणी पाय आमचे शुज!! काट्यांच रूतणं दगडांची ठेच, कसा सोडवायचा हा सारा पेच!! मुसळधार पाऊस पाण्याचा कडेलोट, पोत्याचा घोंगटा आमचा रेनकोट!! जुन्या पुस्तकांची अर्धी किंमत, शिवलेल्या वह्यांची वेगळीच गंमत!! पेन मागता कांडी मिळायची, गाईड मागण्याची भिती वाटायची!! साप्ताहिक भुमी राजा न्युज जिल्हा संपादक नांदेड मो. 9763126813
कळमनुरी मतदार संघात कोंग्रेस पक्षाला “जोर का झटका धिरेसे”…..
अंगद सुरोशे भुमीराजा ता. हिमातनगर/प्रतिनीधी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघात राजकीय उलथापालथ माजी. आमदार संतोष टारपे व अपक्ष जि.प.सदस्य डाॅ. अजित मगर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश कळमनुरी येथील स्व.मा.खासदार राजीव सातव यांचे अत्यंत विश्वासू असणारे मा.आमदार संतोष टारपे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन कोंग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला असल्याने कळमनुरीत राजकारणाचे समीकरण बदलणार आसे चित्र आहे कारण काही दिवसा पुर्वी कळमनुरी...
बाळापूर विधान सभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे ना पाठिंबा!
कृष्णा घाटोळ भूमिराजा शहर प्रतिनिधी बाळापुर अकोला :- जिल्ह्यातील बाळापूर शहरातील व पातूर तालुक्यातील चतारी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.सदर पक्ष प्रवेश बाळापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात पार पडला. स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने खा.डॉ.श्रीकांत जी शिंदे साहेब व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार...
गणेशउत्सव आनंदात साजरा करा परंतु डी.जे.ला परवाना नाही…… अधिक्षक प्रमोद शेवाळे
हिमायतनगर पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांची भेट अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी/हिमायतनगर| गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशेत्सव साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसेंदिवस पर्यावरण दूषित होत चालले असून, प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या वस्तूंपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीं पर्यावरणाला अडचणीत आणणारी आहेत. या मुर्त्या विसर्जन केल्याने जलसाठे प्रदूषित होत आहेत. या प्रदूषित झालेल्या पाण्याचे परिणाम भयंकर होत असून, येणाऱ्या पिढ्यांना...
गोर बंजारा तीज उत्सव समिती वाशी येथील तीज महोत्सव विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न!
भूमीराजा न्यूज,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड -9145043381 हिमायतनगर/- तालुक्यातील वाशी तांडा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माता जगदंबा च्या कृपेने, संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षी तीज उत्सवाचे आयोजन केले जाते, यावर्षी ही वाशी तांडा येथे तीज महोत्सव आयोजित करण्यात आलेहोते. या तिज महोत्सव नऊ दिवसांचा आयोजित करण्यात आला होता. या नऊ दिवसांमध्ये गावातील सर्व महिला,मुली व पुरुषांनी या माता जगदंबा ची तीजेची पूजा-अर्चना केली जाते. अखेर...
गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने नदी स्वच्छता अभियानाचा 18 वा आठवडा
पूर परिस्थिति व श्रावण महिन्याच्या निर्माल्यान गोदावरी च्या प्रदुषणात मोठी वाढ हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता, त्यामुळे गोदावरीच्या पात्राची वाढ होवुन मोठ्या प्रमाणात गोदावरी तिराच्या आजू बाजूच्या भा गातील कचरा व त्यातच श्रावण महिन्याचे व्रतवैकल्याचे निर्माल्य व धार्मिकविधी यामुळे गोदावरी नदीच्या प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सिने...
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात…..
शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत...... भूमीराजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड - ९१४५०४३२८१ हिमायतनगर /- तालुक्यातील बोरगडी, बोरगडी तांडा,धानोरा, वारंगटाकळी,कोठा, कोठा ( ज ), मंगरूळ, सिबदरा, कारला, खडकी, सरसम, पोटा, दाबदारी, सोनारी, जवळगाव, आदी सर्कल मधील खरीप हंगामातील पिके सोयाबीन, कापूस, उडीद, मूग पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन पीक धोक्यात असल्याचे दिसत आहे. मृग नक्षत्रात पाऊस समाधानकारक पडल्यामुळे पेरणी वेळेवर झाली. पण त्यानंतर सतत पाऊस...
खडकी ( बा) तांडा येथे पोळा सण नाईक अनिल पवार कारभारी साहेबराव जाधव मोट्या उत्साहात साजरा……..
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी रवीकुमार पवार खडकीकर.-७३५०३३३४१५ हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार तांडा येथे बैल पोळा सण शांततेत व कायद्यांचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला. खडकी बाजार येथे श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात गावातील सर्व शेतकरी बंधूनी आपापले सर्जा राजांना घेऊन ठीक पाच वाजता हजर झाले होते. सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना घेऊन श्री हनुमान मंदिराच्या अवतीभवती फेऱ्या शांततेत घालून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. खडकी...
होळकर पुलावर चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा अहिल्यादेवी होळकर पुलावर मोठी वाहतूक कोंडी नाशिक शहरातील अनेक ठिकणी वाहतूक कोंडीची समस्यानिर्माण होत असताना, त्यात आता गोदावरी नदी वरील होळकर पुलावरील चारचाकी वाहनांची अनाधिकृत पार्किंग ची नवीन भर पडली आहे. रविवार कारंजाकडून पंचवटी कारंजाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील होळकर पुलावर अनधिकृतरित्या चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे, त्यामुळे मोठी बाजार पेठ असलेल्या रविवार कारंजा येथील...
