अतिवृष्टीने “होत्याचं नव्हतं झालं”….
👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी केली पाहणी. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 16 जुलै 2022 हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी होऊन, 668.20 मिमी एवढा पाऊस पडला. शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. विविध वृत्तपत्रांत बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. काल हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांनी झंझावाती दौरा करत, पुरगृस्त भागाची पाहणी केली. शेतकरी बांधवांना धिर देऊन, ते म्हणाले तुमच्या...
हिमायतनगर येथील तहसीलदार गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका..
प्रभारी तहसीलदार म्हणून अवधाने रुजू….. हिमायतनगर | कृष्णा राठोड/- तालुक्यात मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या खैरगाव फुलाजवळ हिमायतनगरचे तहसीलदार डी एन गायकवाड यांना अचानक दुपारी 3 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले त्यांचे प्रकृती सध्या स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले त्यामुळे त्यांच्या...
आमदार माधवराव पाटील जळगावकर पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर……
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याची मागणी....... हिमायतनगर | कृष्णा राठोड/- तालुक्यात मागील आठ दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त प्रचंड पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले या मुसळधार झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा येथील शेतकऱ्याला बसल्याने त्यांच्या शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातून हे खरीप हंगाम पूर्णतः निघून गेला असून त्यांची शेती सुद्धा खरडून गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाची भेट
राजपूत समाजाला प्रतिनिधित्व देणे करिता आमदार श्री.किशोरअप्पा पाटील याना मंत्रिमंडळामध्ये घ्यावे:- अजय सिंह सेंगर मुंबई:- राजपूत महामोर्चाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली, राजपूत महामोर्चा प्रमुख अजय सिंह सेंगर यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना सागितले महाराष्ट्र मध्ये राजपूत समाज हां तेरा टक्के आहे. या समाजाचा विकास करने साठी आणि राजपूत समाजाला न्याय आणि प्रतिनिधित्व देणे करिता पाचोरा...
राज्य सरकार नी पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी पन्नास हजार रु नुकसान भरपाई द्यावे .
दिनेश राठोड तालुकाध्यक्ष ( बंजारा युवा टायगर फोर्सं) यांची मागणी.... हिमायतनगर/..कृष्णा राठोड भूमीराजा हिमायतनगर, शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड बोरगडीकर ९१४५०४३३८१
अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीची मदत द्यावी.. डाॅ.अब्दुल गफार कारलेकर…
अंगद सुरोशै प्रतिनिधी :- हिमायतनगर तालुक्यात झालेल्या आतिवृष्ठीत तालुक्यातील अनेक गावात पावसाचा फटका बसला आसुन बरेच कुटुंब बेघर झाले आहेत तरी लोकप्रतिनिधींनी आ. जळगावकर यांनी तहसीलदार साहेब व ग्रामपंचायत यांच्या मार्फत पंचनामे करुन झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करावी रोजमजुरीवर आपला उदरनिर्वाह करणारे कुटुंब पावसात झालेल्या पडझडीने मात्र हतबल झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आसल्याचे डाॅ.अब्दुल गफार भष्टाचार...
थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय झाल्याने ग्रामीण जनता खुश!
परभणी, (आनंद ढोणे) :- महाराष्ट्र राज्यातील खेड्यातील ग्रामविकास लक्षात घेता फडणवीस-शिंदे सरकारने यापुढे पाच वर्ष पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याचा निर्णय घेतल्याने खेडेगावातील नागरीक खुश झाल्याचे पहावयास मिळत आहे. या पूर्वी देखील सरपंच-नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा निर्णय हा जनतेतून होता. परंतु, मध्यंतरीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या निर्णयास स्थगिती दिली होती. मात्र, "देवाची करणी अन् नारळात...
महावितरणचे कर्मचारी अतिवृष्टी मध्येही जीवाची पर्वा न करता बजावले आहे आपले कर्तव्य
तालुक्यातील जनतेकडून महावितरण कर्मचाऱ्याचे सर्व स्तरावरुन व्यक्त होत आभार.... हिमायतनगर | कृष्णा राठोड तालुक्यामद्ये आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु असून नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असुन अतिवृष्टीजन्य परस्थीती करता निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विभागाचे कर्मचारी घरी बसुन कुंटुबा सोबत वेळ घालीत आहेत , पण महावितरणचे कर्मचारी मात्र भर पावसात , गावातील , शहरातील जनतेसाठी धडपड...
शितल शेगोकार यांची स्त्रीशक्ती मंच संघटनेच्या बुलढाणा अध्यक्षपदी निवड
शेगाव प्रतिनिधी स्त्री शक्ती मंच संघटना संस्थापक अध्यक्ष सौ शारदा अतुल भुयार कारंजा लाड यांनी त्यांचे सामाजिक कार्य बघून त्यांचे स्त्री शक्ती मंच संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड केली. शितल शेगोकार सोशल वर्कर असून बुलढाणा जिल्हा पर्यावरण अध्यक्ष आहेत अंगणवाडी वर्कर आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ विभाग कोषाध्यक्ष आहे.. बुलढाणा उज्जैन कर फाउंडेशन जिल्हा दक्षता समितीच्या समन्वय क...
परभणी-हिंगोलीत संततधार पाऊस चालूच नदी नाल्यांच्या पुरामुळे सर्वत्र हाहाकार,खरीप पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत!!
परभणी, ( आनंद ढोणे पाटील) :- गेल्या तीन दिवसापासून परभणी, हिंगोली,नांदेड जिल्हा परिसरात रात्रंदिवस लहान मोठ्या झड पाऊसाची संततधार चळक वा-यासह चालूच असून ज्या त्या ठिकाणच्या शेत शिवरातून जसे, दुधना, पैनगंगा, गोदावरी, पूर्णा, कयाधू, आसना ह्या मोठ्या नद्यासह सर्वच लहान मोठी नदी नाले दुधडी भरुन वाहत आहेत. पुराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून जावून जनजीवन विस्कळीत झाले...
