मौजे किनी येथील सौ. सुजाता त्रिपनरेडी मुत्यलवाड यांना जिल्हा मध्यवर्ती बॅकेला मतदानाचा सर्वानुमते दिला अधिकार .…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 10 एप्रिल 2026 भोकर तालुक्यातील मौजे किनी येथील सेवा सहकारी सोसायटी नुकतीच दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी मौजे किनी ता. भोकर येथील सेवा सहकारी सोसायटीची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या उमेदवाराला मतदानाचा अधिकार सौ. सुजाता त्रिपन रेड्डी मुत्यलवाड यांना एकमताने देण्यात आला आहे. मुत्यलवाड यांची निवड झाल्याने त्यांना...
*”जय किसान फार्मर्स फोरमच्या “कृषी गौरव” पुरस्कारांचे १० एप्रिलला नाशिकमध्ये वितरण”*
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा न्युज मो. नंबर - 8983319070 *मा. आबासाहेब मोरे यांच्या शुभहस्ते ३८ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान"* *नाशिक-* भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त निमित्त १० एप्रिलला प. सा. नाट्यगृह, सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे स.११.३० वाजता मा. आबासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३८ शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला...
विजेच्या लंपडावामुळे शेतक-यांचे पिके करपली…
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 8 एप्रिल 2026 हिमायतनगर तालुक्यांत शेतक-यावरील संकटे संपता सपेनात आधी अवकाळी पाऊस आणी आता विजेचा लपंडाव त्यामुळे शेतक-यांच्या शेतातील ऊन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तेलवर्गीय पिक म्हणुन तिळ पिकांची पेरणी दरवर्षी करतो..त्याचबरोबर ज्वारी, उन्हाळी मुग, भाजीपाला आदी पिके शेतक-यांनी यावर्षी घेतलेली असतांना विद्युत पंप चालु केल्या केल्या अवघ्या पाच मिनीटात लाईट जात आहे...या आठवड्यात दिवसा...
बाळापुर तहसिलवर एक दिवसीयआंदोलन,व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नरेंद्रर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन बाळापुर तालुका प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडी,युवा आघाडी,भारतिय बौद्ध महासभा,महिलाआघाडी,व ईतर सर्व विंगची टीम, यांनी या निवेदनात- “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आणि नियोजनात मोठ्या संख्येने बाळापुर येथे सहभागी झालेत. वंचित बहुजन आघाडी, बाळापुर ता.मधिल सर्व पदाधिकारी,वंचित बहुजन आघाडी आपल्या पक्षाच्या वतीने ६ एप्रिल २०२६ रोजी "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन" प्रत्येक जिल्हा, शहर, तालुका ठिकाणी...
*निधन वार्ता*
माहूरच्या पवित्र भूमीत दत्त शिखराच्या गादीवर विराजमान अध्यात्म,सेवा आणि परंपरेचे जिवंत प्रतीक महंत *श्री मधुसूदनजी भारती महाराज(मालक)* यांना आज देवाज्ञा झाली. अत्यंत दुःखद आणि वेदनादायी बातमी 🙏 त्यांनी आयुष्यभर दत्तभक्ती, समाजसेवा,धर्मसंवर्धन यासाठी अखंड कार्यमग्न राहून भक्त संप्रदायाला आध्यात्मिक दिशा आणि जगण्याचं बळ मिळवून दिलं. देश धर्म आणि जनतेसाठी दिशादर्शक गुरुतत्व आज हरपले... आपल्या जाण्याने आज फार मोठी पोकळी निर्माण झाली... अत्यंत भावपूर्ण...
मोखा ता बाळापूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न
भूमीराजा प्रतिनिधी / संतोष मोरे . . . . बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यात ग्राम मोखा या गावात आज एक ऐतिहासिक धम्म सोहळा संपन्न .मोखा येथील त्रिमूर्ती बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध मूर्तीची स्थापना व भिक्खू संघाची जाहीर धम्म देशना पार पडली .आज ३१ मार्च २०२६, सकाळी ७ वाजतापासून मोखा येथे धम्ममय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात होऊन भगवान बुद्धाच्या...
नाशिक लेडीज सर्कल व राउंड टेबल इंडिया यांच्या मार्फत डॉ. भा. वि. जोशी महाराष्ट्र हाय स्कूल या शाळेत प्रयोग शाळा साहित्य वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा न्युज मो. नंबर - 8983319070 नाशिक लेडीज सर्कल व राऊंड टेबल इंडिया यांच्यार्फत डॉ भा, वि जोशी महाराष्ट्र हायस्कूल या शाळेत प्रयोग शाळा साहित्य वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न, नाशिक लेडीज सर्कलच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिसम सबरवाल व विभाग प्रमुख,सौ मेघा राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत,शाळेला प्रयोग साहित्य,मायक्रोस्कोप व विविध मॉडेल साहित्य वितरित करण्यात आले,या प्रसंगी,सौ शीतल...
वादळी वा-यासह पावसाचा कहर..
👉 शेतक-यांच्या पिकाचे मोठे नुकसान मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेडदिनांक- 31 मार्च 2026 हिमायतनगर तालुक्यासह जिल्हयात ठिकठिकाणी निसर्गाचा प्रकोप सुरु आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतक-यांचे पिवळे सोने हळदीसह, हरभरा, गव्हु, टाळकी ज्वारी, कांदा, तिळ आदि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हयात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला होता..अगदी त्याप्रमाणे हवामान अंदाज खरा ठरला..आणी सोमवारी रात्रीला वादळी वा-यासह पावसाने...
* भोंदू बाबांच्या नवं नव्या प्रकरणातून काय शिकावे..??
नाशिक मधील अशोक खरात या भोंदू बाबांचे प्रकरण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रचंड गाजत आहे आणि वाजतंही आहे. अशोक खरात हा काही पहिला भोंदू बाबा नाही. या अगोदर असे अनेक भोंदू बाबा येऊन गेले. मांत्रिक, बाबा, बापू ,महाराज अशी नवंनवी रुप घेऊन दरवर्षी नवे नवे बाबा प्रकट होतात. कुणी मन:शांती प्रदान करतो कुणी घरात,कुटूंबात शांतता प्रस्थापित करतो,कुणी दुर्धर आजार...
नाशिक महानगरपालिकेच पुन्हा ” आंधळ दळतय अन कुत्र पीठ खातय ” असं गोदापात्राच्या कामांच्या बाबतीत होणार का?
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 नाशिक मध्ये सध्या पंचवटी मधील दहिपुला शेजारील गोदावरी पात्रातील खोली वाढावण्याच्या कामी गोदा पात्रातील दगडी भुस्थर बुलडो झर लावून काढण्याचे काम चालू आहे. मागच्या वर्षी देखील गोदापात्र स्वच्छ करण्याच्या नावाखाली वाळुच उत्खनन मोठया प्रमाणावर करून काही माफियांनी मोठया प्रमाणावर आर्थिक लुट केली होती, ती सुध्दा डोळ्यावर झापडं लावलेल्या...










